गांधी कुटुंबियांना केंद्राचा मोठा झटका; राजीव गांधी फाउंडेशनचे FCRA लायसन्स रद्द

नवी दिल्ली, २३ ऑक्टोबर २०२२: केंद्राने गांधी कुटुंबाशी संबंधित असलेल्या राजीव गांधी फाऊंडेशन (आरजीएफ) या गैर-सरकारी संस्थेचा फॉरेन कॉन्ट्रिब्युशन रेग्युलेशन ॲक्ट (एफसीआरए) परवाना कायद्याच्या कथित उल्लंघनासाठी रद्द करण्यात आला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

२०२० मध्ये गृह मंत्रालयाने स्थापन केलेल्या आंतर-मंत्रालयी समितीने याबाबत तपास केला आणि या समितीच्या अहवालाच्याआधारे, राजीव गांधी फाऊंडेशनचा एफसीआरए परवाना रद्द करण्यात आला आहे. राजीव गांधी फाऊंडेशन वर विदेशी निधी चा गैरवापर केल्याचा आरोप आहे.

सोनिया गांधी आहेत अध्यक्ष!

माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या RGF च्या अध्यक्षा आहेत. तर अन्य विश्वस्तांमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी अर्थमंत्री पी चिदंबरम, काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांचा समावेश आहे.

१९९१ मध्ये स्थापन झालेल्या RGF ने १९९१ ते २००९ पर्यंत आरोग्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान, महिला आणि मुले, अपंगत्व समर्थन इत्यादींसह अनेक गंभीर समस्यांवर काम केले. तिच्या वेबसाइटनुसार, शिक्षण क्षेत्रातही काम केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा