होळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वाढणार पगार! इतका हाईक मिळू शकेल

13

नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी 2022: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना होळीपूर्वी पगारवाढीची भेट मिळू शकते. केंद्रीय कर्मचारी महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलत (DR) आणि घरभाडं भत्ता (HRA) वाढवण्याची दीर्घकाळ वाट पाहत होते. सरकारने याबाबत अद्याप अधिकृतपणे काहीही सांगितलेलं नाही, परंतु विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार होळीपूर्वी याची घोषणा केली जाऊ शकते. अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक जाहीर झाल्यानंतर डीएमध्ये वाढ होण्याची शक्यता बळकट झालीय.

इतका वाढू शकतो DA

विविध मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आलाय की, सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) तीन टक्क्यांपर्यंत वाढ करू शकते. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सरकार डीएमध्ये वाढ जाहीर करेल.

केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना सध्या मूळ वेतनाच्या 31% इतका डीए मिळत आहे. यापूर्वी ऑक्टोबर 2021 मध्ये सरकारने डीए 28 टक्क्यांवरून 31 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती. ही वाढ 1 जुलै 2021 पासून लागू झाली. केंद्र सरकारने होळीपूर्वी महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या 34 टक्के इतकाच महागाई भत्ता मिळेल. सुमारे 48 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख पेन्शनधारकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.

काय आहे महागाई भत्ता

वाढत्या महागाईबरोबरच लोकांचं उत्पन्न वाढवणेही गरजेचं आहे. सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना डीए देते. त्याचा उद्देश महागाई दराचा प्रभाव कमी करणं हा आहे. महागाई भत्ता मूळ वेतनाच्या आधारे मोजला जातो. केंद्र सरकार सामान्यतः जानेवारी आणि जुलैमध्ये डीए आणि डीआरशी संबंधित लाभांमध्ये सुधारणा करते. शहरांनुसार कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये तफावत आहे.

HRA बाबत महत्त्वाची घोषणा केली जाऊ शकते

केंद्र सरकार एचआरए वाढवण्यासाठी महत्त्वाची घोषणाही करू शकते. सध्या, A, B आणि C श्रेणीतील शहरांतील कर्मचाऱ्यांना अनुक्रमे 24 टक्के, 16 टक्के आणि 8 टक्के दराने HRA दिला जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा