गोल पोस्ट राष्ट्रीय अनलॉक ५ साठीची केंद्र सरकारची नवीन नियमावली जाहीर, वाचा सविस्तर

अनलॉक ५ साठीची केंद्र सरकारची नवीन नियमावली जाहीर, वाचा सविस्तर

नवी दिल्ली, १ ऑक्टोंबर २०२०: केंद्रीय गृहमंत्रालयानं देशातील कोविड प्रतिबंधक क्षेत्रं वगळता इतर ठिकाणी, सर्व व्यवहार नव्यानं सुरु करण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचना, आज म्हणजेच एक ऑक्टोबर २०२० पासून लागू होणार असून, त्यानुसार अनेक ठिकाणी नव्यानं व्यवहार सुरु करण्यासाठीची मोकळीक देण्यात आलीय. विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी पाठवलेल्या अहवालांच्या आधारावर आणि सविस्तर चर्चेनंतर या मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आल्यात.

▫️नव्या मागर्दर्शक सूचनांमधील ठळक वैशिष्ट्ये

• प्रतिबंधित क्षेत्रांच्या बाहेर, १५ ऑक्टोबर २०२० नंतर परवानगी देण्यात आलेले व्यवहार

> सिनेमा/थियेटर/मल्टीप्लेक्स यांना त्यांच्या क्षमतेच्या ५० टक्के आसन व्यवस्थेनुसार सुरु करण्याची परवानगी देण्यात आलीय. याविषयीचे प्रमाणित कार्यान्वयन प्रोटोकॉल SOP माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडून जारी केले जातील.

> उद्योग ते उद्योग (B2B) प्रदर्शन सुरु करण्याची परवानगी, त्यासाठीचे प्रमाणित कार्यान्वयन प्रोटोकॉल (SOP) वाणिज्य मंत्रालयाकडून जारी केले जातील.

> क्रीडापटूंना प्रशिक्षण देण्यासाठीचे जलतरण तलाव सुरु करण्यास परवानगी त्यासाठीचे प्रमाणित कार्यान्वयन प्रोटोकॉल(SOP) केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाकडून जारी केले जातील.

> मनोरंजन पार्क्स आणि तत्सम जागा सुरु करण्यास परवानगी, त्यासाठीचे प्रमाणित कार्यान्वयन प्रोटोकॉल(SOP) केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाकडून जारी केले जातील.

• शाळा, महाविद्यालये, शिक्षणसंस्था आणि कोचिंग क्लासेस सुरु करण्याविषयी

१५ ऑक्टोबर २०२० नंतर, टप्याटप्यानं ,शाळा-महाविद्यालये, कोचिंग संस्था सुरु करण्याबाबतचा निर्णय घेण्याची मोकळीक सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आलीय. हा निर्णय, संबधित शाळा/संस्थांच्या व्यवस्थापनाशी चर्चा करुन, त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच, घेतला जावा. मात्र त्यासाठी खालील काही अटींचं पालन करणं आवश्यक :-

> कोणत्याही आवडीच्या डिजिटल माध्यमाद्वारे ऑनलाईन/दूरस्थ शिक्षण देणं सुरूच राहील आणि त्याला अधिकाधिक प्रोत्साहन दिलं जावं.

> जिथं शाळा ऑनलाईन वर्ग घेत आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जाण्यापेक्षा ऑनलाईन पद्धतीनेच शिकण्याची इच्छा आहे, त्यांना तसे करण्याची परवानगी देण्यात यावी.

> विद्यार्थी केवळ आपल्या पालकांच्या लिखित परवानगीनंच शाळा/संस्थांमध्ये शिकण्यास येऊ शकतील.

> उपस्थिती अनिवार्य केली जाऊ नये, पालकांच्या संमतीवरच उपस्थितीचा निर्णय अवलंबून असावा.

▫️मोठ्या संख्येनं एकत्र येण्यावर निर्बंध

सामाजिक/शैक्षणिक/क्रीडा/मनोरंजन/सांस्कृतिक/धार्मिक/राजकीय कार्यक्रम आणि इतर कार्यक्रमांसाठी यापूर्वीच प्रतिबंधित क्षेत्राबाहेर १०० व्यक्तींच्या जमावाला परवानगी दिली आहे. आता राज्य/केंद्रशासित प्रदेशांना अशा समारंभांसाठी १५ ऑक्टोबर २०२० नंतर प्रतिबंधित क्षेत्राबाहेर १०० पेक्षा अधिक व्यक्तींना मान्यता देण्याची परवानगी देण्यात आली आहे. जी खालील अटींसह असेल:

> बंद जागेत सभागृह हॉल क्षमतेच्या कमाल ५०% परवानगी दिली जाईल, ज्याची २०० लोकांची कमाल मर्यादा असंल. फेस मास्कचा वापर, योग्य अंतर राखणे, थर्मल स्कॅनिंगची व्यवस्था आणि हात धुण्यासाठी सॅनिटायजरचा वापर अनिवार्य असंल.

> खुल्या जागेत, मैदानाची जागा विचारात घेता/एकंदरीत जागा पाहता, योग्य अंतराची काटेकोर अंमलबजावणी, मास्कचा वापर अनिवार्य, थर्मल स्कॅनिंग आणि हात धुण्यासाठी सॅनिटायजरची व्यवस्था असंल.

> अशा प्रकारच्या जमावातून कोविड-१९ चा प्रसार होऊ नये, यासाठी राज्ये/ केंद्रशासित प्रदेश सविस्तर मानक संचालन प्रक्रिया (एसओपी) जारी करुन त्याची काटेकोर अंमलबजावणी करतील.

▫️प्रतिबंधित क्षेत्रांबाहेर खालील कृतींशिवाय इतर कृतींना परवानगी देण्यात आली आहे:

१. आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास, केवळ केंद्रीय गृहमंत्रालयाच्या परवानगीनेच.

२. मनोरंजन पार्क आणि तत्सम ठिकाणे बंद राहतील.

• प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये टाळेबंदीची ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत काटेकोर अंमलबजावणी करण्यात येईल.
जिल्हा प्रशासनाकडून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या नियमावलीनुसार संक्रमण साखळी खंडित करण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्रांचे आरेखन करण्यात येईल. प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता प्रतिबंधित उपायांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येईल. प्रतिबंधित क्षेत्रांतर्गत, काटेकोर परिघीय नियंत्रण लागू होईल, केवळ अत्यावश्यक सेवांना परवानगी असेल.

• प्रतिबंधित क्षेत्रांची माहिती संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी आणि राज्य, केंद्रशासित प्रदेशांनी संकेतस्थळावर प्रकाशित करावी आणि केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाशी सामाईक करावी. राज्ये प्रतिबंधित क्षेत्रांबाहेर स्थानिक टाळेबंदी लागू करु शकत नाहीत.

• राज्ये/केंद्रशासित प्रदेश स्थानिक पातळीवर (राज्य/जिल्हा/उप-विभाग/शहर/ गाव पातळी), प्रतिबंधित क्षेत्राबाहेर केंद्र सरकारशी सल्लामसलत केल्याशिवाय टाळेबंदी लागू करु शकणार नाहीत. राज्यांतर्गत आणि आंतर-राज्य वाहतुकीवर निर्बंध नाहीत

• राज्यांतर्गत आणि आंतर-राज्य व्यक्तींच्या अथवा मालवाहतुकीस निर्बंध नाहीत. अशाप्रकारच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र परवानगी/मंजूरी/ई-परमिटची आवश्यकता नाही.

▫️कोविड-१९ व्यवस्थापनासंबंधी राष्ट्रीय निर्देश

कोविड-१९ व्यवस्थापनासंबंधीचे सामाजिक अंतरासंबंधीचे राष्ट्रीय निर्देश देशभरात लागू राहतील. दुकानदारांनी ग्राहकांमध्ये योग्य ते अंतर राहिल याची दक्षता घ्यायची आहे. केंद्रीय गृहमंत्रालय राष्ट्रीय निर्देशांच्या प्रभावी अंमलबजावणीवर लक्ष ठेवून असेल.

जोखीम असलेल्या व्यक्तींना संरक्षण

जोखीम असलेल्या व्यक्ती, म्हणजे ज्यांचे वय 65 वर्षापेक्षा अधिक आहे, सह-रुग्णता आहे, गर्भवती महिला आणि १० वर्षांखालील बालके, यांनी घरीच थांबावे. केवळ अत्यावश्यक आरोग्यविषयक बाबींसाठी बाहेर पडावे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

error: Content is protected !!
Exit mobile version