कोरोना लसीबाबत केंद्राचा राज्याबाबत दुजाभाव

पुणे, १० एप्रिल २०२१: संपूर्ण जगभरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.तर अनेक देशांमध्ये कोरोना विषाणुची तिसरी लाट आली आसून भारतात या विषाणुची दुसरी लाट आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे कोरोनाची लागण झपाट्याने होत आहे.
सध्या देशात कोरोनाची भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे.तर देशातील महाराष्ट्र राज्यात ज्या वेगाने रूग्ण वाढतायंत ते संपूर्ण आशिया खंडात तिसर्या क्रमांकावर आहे.कोरोना वर लसी आता उपलब्ध झाली आसून देशात लसीकरणाला सुरवात झाली आहे.पण या आश्यात ही केंद्र सरकार हे महाराष्ट्राबरोबर दुजभाव कराताना दिसत आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणात झाला आहे.दिवसाला ५०,००० नवीन रूग्ण आढळत आहेत.तर महाराष्ट्र सरकार या परिस्थितीचा खंबीर पणे सामना करत आसून केंद्र सरकार मात्र या राज्याकडे दुर्लक्ष करत आसल्याचे टीकास्त्र सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय झाला आहे.
केंद्र सरकारने लसीचे डोस प्रत्येक राज्यात वितरित केले.पण यामधे ही राजकारण करत महाराष्ट्रावर अन्याय केला गेला असं म्हटलं जातंय.ज्या राज्यात भाजपचे सरकार आहे तिथे कोरोना लशींच्या डोसचे वितरण चांगले केले आहे तर जिथे भाजपचे सरकार नाही अश्या राज्यांना कमी लशींचे डोस देण्यात आले आहेत पाहूयात डोस वितरित केलेली आकडेवारी.
भाजप सरकार नसलेल्या राज्यांना मिळालेले कोरोना लशींचे डोस (१५ ते २०एप्रिल) ……
महाराष्ट्र : १७,४३,२८० डोस
आंध्र प्रदेश : १०,५८,१७० डोस
छत्तीसगड : ६,८४,२९० डोस
केरळ : ४,७४,७१० डोस
राजस्थान : ३,८३,२६० डोस
भाजप आसलेल्या राज्यांना मिळालेले कोरोना लशींचे डोस……
उत्तर प्रदेश : ४३,९८,४५० डोस
मध्य प्रदेश : ३३,७६,२२० डोस
कर्नाटक : २९,०६,२४० डोस
हरयाणा : २४,६८,९२० डोस
गुजरात : १५,५७,८७० डोस
तसे भाजपशासित राज्यात जास्त डोस तर नसलेल्या ठिकाणी कमी डोस वाटप करण्यात आले आहेत. हे या आकडेवारी वरून स्पष्ट होते.
 महाराष्ट्र बरोबर होत आहे राजकारण….
अश्या कठीण परिस्थितीत विरोधी पक्ष सरकार बरोबर मिळून जनतेसाठी कार्य करायचे तर महाराष्ट्रात कोरोना वरून महाविकास आघाडीला  विरोधी पक्ष हे धारेवर धरत आहे.राज्यातीलच विरोधी पक्ष नाही तर केंद्रातील नेते देखील महाराष्ट्रातील आघाडी सरकारवर ताशेरे ओढताना दिसत आहे.
केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ८ एप्रिलला एक ट्विट केले ज्या मधे “महाराष्ट्राने कोरोना लसींवरून राजकारण करू नये तसेच,महाराष्ट्राने ५ लाख लशी वाया घालवल्या.” असा आरोप त्यांनी महाराष्ट्रावर केला.
आरोग्य मंत्री डाॅ हर्षवर्धन यांनी ही महाराष्ट्रातील सरकारवर टीकेचे बाण सोडत “महाराष्ट्राच्या चुकीमुळे देशाच्या करोनाविरोधातील लढ्याला फटका बसला असे वक्तव्य केंद्रीय आरोग्यमंत्रीडॉ. हर्षवर्धन यांनी केले.”
केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या ट्विट ला राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.ते म्हणाले की,”लसीकरणावरून महाराष्ट्र राजकारण करत नाहीये.याउलट लस वाया जाण्याची जी राष्ट्रीय सरासरी आहे ती आपण महाराष्ट्राच्या नावावर खपवताय.”
तर आरोग्य मंत्री डाॅ हर्षवर्धन यांच्या महाराष्ट्रावर केलेल्या विधानावरून काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी आरोग्यमंत्री डाॅ हर्षवर्धन यांनी महाराष्ट्राचा आपमान केला.अशी टिका केली आहे.
केंद्र सरकारने विचार करावा…..
केंद्र सरकारने ही एका गोष्टीचे आत्मचिंतन करणे गरजेचं आहे.जिथे भारताची लोकसंख्या  सव्वाशे कोटींच्या पार आहे.तिथे लसीकरण करण्यासाठी अधिक डोस लागणार हे कळत आसतानाच दुसर्या इतरत्र देशांना ६ कोटी डोसचे वाटप करण्यात आले.तेच डोस जर देशातील अनेक राज्यांना दिले आसते तर लसींचा तुटवडा देशात निर्माण झाला असता? याचा विचार करणे गरजेचं आहे.
या सर्व कोरोना परिस्थिती मधे केंद्र आणि राज्य सरकार मधे तू तू मैं मैं चालू आहे.तर यामुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत.या महामारीमुळे मुळे पुन्हा एकदा राज्यात दहशत पसरली आहे.तर मृतदेहाचे ढिग हे राज्यातील अनेक शहरांत साचत आहेत.अश्या या भयावह परिस्थितीमधे राजकारण्यांनी राजकारण बाजूला ठेवून जनतेचा विचार करणे गरजेचं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा