पुणे, ३० ऑगस्ट २०२२: राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलकडून घेण्यात आलेल्या विविध अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांचा निकाल सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होणार आहे.
उच्च शिक्षण अंतर्गत असलेल्या अभ्यासक्रमांचा निकाल १० सप्टेंबर, तर एमएचटी सीईटी चा निकाल १५ सप्टेंबर पासून जाहीर होणार आहे. प्रवेश परीक्षांना २ ऑगस्ट पासून विविध अभ्यासक्रमांची सुरुवात झाली. तांत्रिक अडचणी, अतिवृष्टी अशा विविध संकटांचा सामना करीत या परीक्षा सीईटी सेलकडून यशस्वीरीत्या घेण्यात आल्या.
तांत्रिक अडचणी निर्माण झालेल्या सर्व्हरमुळे आणि जे विद्यार्थि अतिवृष्टीमुळे परीक्षा देऊ शकले नव्हते अशा विद्यार्थ्याच्या भविष्याचा विचार करून सीईटी सेल कडून त्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून दिली होती.त्यानुसार एलएलबी पाच वर्षे आणि तीन वर्षे, बीएड – एमएड, बी- प्लॅनिंग आणि एमसीए या अभ्यासक्रमांची पुन: परीक्षा २७ ऑगस्टला, तर एमएचटी सीईटीच्या परीक्षा २९ ऑगस्टला घेण्यात आल्या.
एमएचटी सीईटीचा निकाल १५ सप्टेंबरपर्यंत….
अभियांत्रिकी कृषी वैद्यकीय औषध निर्माण शास्त्र या अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून महत्वाची असलेल्या एमएचटी सीईटी निकाल १५ सप्टेंबर किंवा त्यापूर्वीच जाहीर होणार आहे. २ ते ४ सप्टेंबर दरम्यान विद्यार्थांना त्यांच्या तक्रारी संकेतस्थळावर दिलेल्या लिंकमधून भरायच्या आहेत, त्यानंतर १५ सप्टेंबर किंवा त्याच्या पूर्वीच निकाल जाहीर करण्यात येईल. अशी माहिती सीईटी सेलचे आयुक्त रवींद्र जगताप यांनी दिली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: सुरज गायकवाड