चड्डीवाल्यांच्या हाती आसाम देणार नाही: राहुल गांधी

नवी दिल्ली: आसाम हे राज्य चड्डीवाल्यांच्या हाती जाऊ देणार नाही, असे म्हणत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आरएसएस आणि भाजपवर निशाणा साधला आहे. यावेळी राहुल गांधी म्हणाले की, आम्ही आसामच्या इतिहास, भाषा आणि संस्कृतीवर भाजप आणि आरएसएसचे आक्रमन होऊ देणार नाही. आसामवर नागपूरचा रिमोट कंट्रोल चालू देणार नाही.नोटबंदीसारखी परिस्थिती देशात निर्माण झाली असून त्यामागे भाजपचा कुटील डाव आहे. लोकांना आपसांत लढवून द्वेष पसरवण्याचे काम सरकार करत आहे.मात्र द्वेष हा आसामला मान्य नसून येथील जनता शांततेच्या मार्गाने पुढे मार्गक्रमण करेल. भाजपच्या द्वेषपूर्ण राजकारणाचा डाव यशस्वी होणार नाही.आसामसह देशामध्ये नागरिक आंदोलन करत आहेत. त्यांचा आवाज ऐकायला सरकार तयार नाही, आंदोलकांवर सरसकट गोळ्या चालवल्या जात आहेत.जनतेचा आवाज भाजपला ऐकायचा नाहीये. तुमच्या आवाजाची भीती या सरकारला वाटतेय. तुमचा आवाज दाबून टाकण्याचे धोरण या सरकारने आखले आहे.दरम्यान, राहुल गांधी यांनी भाजपसह आरएसएसवर तोफ डागल्याने आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडायला सुरुवात झाली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा