भोकरदन शहराला खडकपूर्णा धरणातून पाणीपुरवठा करण्याच्या मागणीसाठी साखळी उपोषण व धरणे आंदोलनाला सुरुवात

भोकरदन, २३ फेब्रुवारी २०२४ : भोकरदन शहराला खडकपूर्णा धरणातून पाणीपुरवठा करण्याच्या मागणीसाठी कालपासून नागरिकांकडून साखळी उपोषण व धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. भोकरदन शहरातील पाणीपुरवठा खडकपूर्णा धरणातून सुरळीत करून शहराला नळाद्वारे नियमित पाणीपुरवठा करावा अशा मागणीचे निवेदन नागरिकांच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांकडे देण्यात आले होते. नगरपरिषद भोकरदन व मुख्याधिकारी यांच्या ढिसाळ कारभार व हलगर्जीपणामुळे भोकरदन शहरात २५ ते ३० दिवसाआड पाणी येत असून भोकरदन शहरातील जनता पाण्याअभावी त्रस्त झाली आहे. यापूर्वी देखील शहरातील नागरीकांनी पाणीपुरवठा व विविध समस्याविषयी नगरपरीषदेला वारंवार निवेदन दिले होते. मात्र नगरपरीषद मुख्याधिकारी यांनी नागरीकांच्या कोणत्याही प्रकारच्या निवेदनाची दखल घेतली नाही. त्यामुळे कालपासून नगरपरिषद कार्यालय समोर शहरातील नागरीकांच्या वतीने बेमुदत साखळी उपोषण व धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे.

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मुकेश चिने, माजी नगरसेवक सुरेश शर्मा, माजी नगरध्यक्ष आशाताई माळी, माजी नगरसेवक दिपक बोर्डे, महेश औटी, शोभाताई मतकर, नानासाहेब वानखेडे, गंगाधर कांबळे, डॉ. संजय देशपांडे, भूषण शर्मा, दिपक तळेकर, सुरेश अप्पासाहेब बनकर, शेख नजीर, माजी नगरसेवक रणवीर सिंह देशमुख, राहुल ठाकुर, नारायण तळेकर, ज्ञानेश्वर तळेकर, रमेश बिरसोने उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनीधी : कमलकिशोर जोगदंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा