बीड, २३ फेब्रुवारी २०२४ : बीड राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज अध्यात्मिक गुरु तसेच आर्ट ऑफ लिविंग या माध्यमातून कृषी व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे श्री श्री रविशंकर यांची बंगळूर येथे भेट घेतली.
गुरुवर्य श्री श्री रविशंकर यांचे अध्यात्मिक क्षेत्रासह कृषी व सामाजिक क्षेत्रातील योगदान अलौकिक आहे. नैसर्गिक शेतीचे त्यांनी घेतलेला ध्यास त्यातून उभारलेले कार्य आज संपूर्ण देशात पोहोचले आहे. त्यामुळे त्यांच्या या कार्याचा राज्यात देखील नक्कीच फायदा होईल, असे मत यावेळी धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले. श्री मुंडे यांनी या भेटीत श्री श्री रविशंकर यांना वैद्यनाथाची चांदीची प्रतिमा भेट दिली.
राज्यातील २४ जिल्ह्यात ८६ तालुक्यामध्ये जलयुक्त शिवार २.० योजना राबविण्यात येणार आहे. बीड सारख्या आवर्षणग्रस्त जिल्ह्यातील भूजल पातळी वाढवण्यासाठी या अंतर्गत विशेष प्रयत्न केले जावेत. या दृष्टीने आजच्या बैठकीत चर्चा झाली. यासाठी बीड जिल्ह्यातील ५७ गावाची निवड करण्यात आली आहे.
गाळयुक्त धरण व गाळयुक्त शिवार या अभियानास यशस्वी करण्यासाठी एक ॲक्शन प्लॅन तयार केला जावा, असे धनंजय मुंडे म्हणाले. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वाल्मीक अण्णा कराड, पुणे येथील उद्योजक राज घनवट, नितीन कुलकर्णी, आर्ट ऑफ लिविंगचे प्रसन्न प्रभू, परळी वैजनाथ येथील राजेंद्र सामंत, जगदीश मिटकरी, मुकेश भुतडा, अनुप भन्साळी यासह आदी उपस्थित होते.
न्युज अनकट प्रतिनीधी : अरुन गित्ते