मुंबई, दि. २ जून २०२०: सध्या महाराष्ट्रावर कोरोनाव्हायरस संकट असतानाच आता नवीन संकट उभे राहिले आहे. समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आता चक्रीवादळाचे नवीन संकट समोर उभे राहिले आहे. हवामान खात्याने गुजरात आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांना दोन दिवसांपूर्वीच धोक्याचा इशारा दिला होता. त्यानुसार उद्या दुपारपर्यंत हे चक्रीवादळ मुंबईमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याची दखल घेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना केंद्राकडून सर्वतोपरी मदत केली जाईल असे आश्वासन दिले. सध्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर पंधरा एनडीआरएफ च्या टीम तैनात आहेत. नरेंद्र मोदी यांनी याबाबत आणखीन आवश्यकता भासल्यास ती देऊ असे आश्वासन दिले.
तसेच येणाऱ्या चक्रीवादळामुळे मुंबईसह इतर किनारपट्टीलगतचे जे भाग आहेत त्यासंदर्भात आर्थिक मदत लागल्यास केंद्र सरकार ती पुरवेल असे आश्वासन देखील दिले.
आज रात्री आठ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या संदर्भात एक महत्वाची बैठक घेणार आहेत त्यामध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे होणारे नुकसान तसेच त्याच्या पूर्वतयारीसाठी काय काय करावे याविषयी चर्चा केली जाईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी