राज्यात पुन्हा पावसाची श्यक्यता, मराठवाडा आणी विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबई,२० ऑगस्ट २०२२: महाराष्ट्रात पावसाने काही दिवस विश्रांती दिल्याने सूर्यदर्शन झाले आहे. त्याचबरोबर जनजीवनही पूर्व पदावर येत असल्याचे दिसून येत आहे. परंतु राज्यात पुढील ४८ तासांमध्ये पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज सांगण्यात आला आहे. इतरत्र काही जिल्ह्यात पुन्हा पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागाकडून विदर्भातील नागपूर,भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्याच बरोबर नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. मध्य प्रदेशातील काही जिल्ह्याना रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे विदर्भातील काही नद्यांना पूर येण्याची भीती हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे येत्या २४ ते ४८ तासांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाने उत्तर कोकण, दक्षिण कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ऑरेंज अलर्ट सांगितला आहे. त्याचबरोबर विजांच्या गडगटासह मुसळधार वादळी पावसाचाअंदाज सांगण्यात आलं आहे. घाट माथ्यावरही पावसाचा जोर वाढणार आहे.

दरम्यान मुंबईत आतापर्यंत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे, यावर्षी शहरात मोसमी पावसाने आधीच दोन हजार मिलिमीटरचा टप्पा ओलांडला आहे. पावसाळा संपायला अजून दीड महिना बाकी असल्याने मुंबईत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कोकणासह घाटमाथ्यावरही पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची शक्यता आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा