नवी दिल्ली, ४ फेब्रुवरी २०२१: शेअर बाजाराच्या तेजीमुळे सोन्याच्या किंमती खाली येताना दिसत आहेत. सोने उच्च स्तरावरून ७,००० रुपयांपेक्षा कमी स्वस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत तुम्हाला स्वस्त सोनं खरेदी करायचं असेल तर आपण केंद्र सरकारच्या सॉवरेन गोल्ड बाँड योजनेत ५ फेब्रुवारीपर्यंत गुंतवणूक करू शकता. सध्या भारतीय बाजारपेठेतील सोने ५० हजार रुपयांच्या खाली आहे.
चालू आर्थिक वर्षाची ११ व्या सोव्हरीयन गोल्ड बाँड मालिका १ फेब्रुवारी ते ५ फेब्रुवारी दरम्यान गुंतवणूकदारांसाठी खुली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) सोन्याच्या सबस्क्रिप्शनची किंमत प्रति ग्रॅम ४,९१२ रुपये निश्चित केली आहे. यापूर्वी जानेवारीमध्ये दहाव्या मालिकेतील सोन्याचे भाव प्रति ग्रॅम ५,१०४ रुपये होते.
प्रत्येक वेळीप्रमाणे यावेळेस ऑनलाईन अर्ज करणाऱ्या गुंतवणूकदारांना रोखेच्या निश्चित किंमतीवर प्रति ग्रॅम ५० रुपये सूट देण्यात येईल. म्हणजेच डिजिटल पेमेंट केल्यावर तुम्हाला एक ग्रॅम सोन्यासाठी ४,८६२ रुपये द्यावे लागतील.बाजारात चालू असलेल्या सोन्याच्या दरापेक्षा या सरकारी सोन्याच्या बाँडची किंमत कमी आहे. सॉवरेन गोल्ड बाँड योजनेत सोन्याची किंमत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ठरवते. बॉण्ड म्हणून आपण किमान एक ग्रॅम आणि चार किलो सोन्यावर गुंतवणूक करू शकता. यावर कर सूटही दिला जातो. याशिवाय योजनेतून बँकेतून कर्जही घेता येईल.
सॉवरेन गोल्ड बाँडचे फायदे
बाँडला किमान अडीच टक्के वार्षिक परतावा मिळेल. सोन्याच्या बाँड मध्ये फसवणूक आणि अशुद्धपणाची शक्यता नाही. हा बाँड ८ वर्षानंतर मॅचुअर होईल. हे स्पष्ट आहे की ८ वर्षानंतर भरघोस पैसे काढले जाऊ शकतात. इतकेच नाही तर पाच वर्षानंतर त्यातून बाहेर पडायला पर्यायही आहे.
आपण किती सोने खरेदी करू शकता
आरबीआय भारत सरकारच्या वतीने सॉवरेन गोल्ड बाँड जारी करते. या बाँडमधील गुंतवणूक एका ग्रॅमच्या गुणाकारांमध्ये केली जाते, एका व्यक्तीसाठी वर्षातील कमाल मर्यादा ५०० ग्रॅम असते. त्याच बरोबर, हिंदू संयुक्त कुटुंब एका वर्षामध्ये जास्तीत जास्त ४ किलो सोन्याचे बाँड खरेदी करू शकतात. आर्थिक वर्षासाठी ट्रस्ट आणि तत्सम युनिट्सच्या बाबतीत गुंतवणूकीची उच्च मर्यादा २० किलो आहे.
सोन्याच्या किंमती जसजशा वाढू लागतात तसे बाँड खरेदीदारांना नफा मिळत जातो. हे बाँड पेपर आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आहेत. ज्यामुळे आपल्याला भौतिक सोन्यासारखे लॉकरमध्ये ठेवण्याचा खर्च सहन करावा लागत नाही. या सोन्याची विक्री बँक, पोस्ट ऑफिस, एनएसई आणि बीएसई व्यतिरिक्त स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मार्फत केली जाते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे