चंदन तस्कर वीरप्पनचा ऑपरेशन “कोकुण” करून खात्मा

मुंबई: दक्षिण भारतातला कुख्यात चंदन तस्कर वीरप्पन हा त्याच्या क्रूर कामांसाठी अजूनही आख्यायिका बनून आहे. १८ऑक्टोबर २०१४ रोजी ऑपरेशन ‘कोकून’ च्या माध्यमातून वीरप्पनचा खात्मा करण्यात आला होता.

हस्तिदंतासाठी जवळपास २००० हत्ती आणि १८४ लोकांना मारणाऱ्या वीरप्पनच्या हौदोसामुळे सरकार अगदी मेटाकुटीला आले होते. यामुळेच वरिष्ठ आयपीएस अधिकारी के विजयकुमार यांना जयललिता यांनी तामिळनाडुच्या स्पेशल टास्क फोर्सचे प्रमुख होण्याविषयी कळवले.
विजयकुमार यांनी आपली पोलीस टीम छोट्या छोट्या भागांमध्ये विभागली. जेणे करून मोहिमेतील बातमी फुटून वीरप्पनपर्यंत जाणार नाही. विजयकुमार यांनी वीरप्पनची जुनी आणि नवीन अशी सगळी माहिती काढली.
हि माहिती काढत अस्तनीतच विजयकुमार यांच्या हाती वीरप्पनचा एक व्हिडिओ लागला. या व्हिडिओत वीरप्पन कागदावरील मजकूर वाचताना दिसत होता. वाचत असताना वीरप्पनच्या एका डोळ्याला त्रास होत असल्याचं विजयकुमार यांनी हेरलं.
वीरप्पनला डोळ्यांचा इलाज करण्यासाठी जंगलाबाहेर आणायचं आणि तिथेच त्याचा खात्मा करायचा यासाठी ऑपरेशन कोकुनची आखणी करण्यात आली.
मिशनच्या आखणीनुसार वीरप्पनचा विश्वास संपादन करून त्याला जंगलाबाहेर आणायचे ठरले. १८ ऑक्टोंबर २००४ च्या रात्री एक ऍम्ब्युलन्स जंगलाबाहेर उभी करण्यात आली.
या ऍम्ब्युलन्समध्ये चालक म्हणून पोलीस खात्यातीलच सरवनन तर त्यांच्या बाजूलाच वैल्लईदुरई बसले होते. मागे वीरप्पन आणि त्याचे सहकारी बसले होते.
पोलिसांनी लावलेल्या सापळ्यांच्या ठिकाणी ऍम्ब्युलन्स आली कि चालकाने जोरात ब्रेक मारून बाहेर उडी टाकायची आणि आतमध्ये वीरप्पन असल्याचा इशारा पोलिसांना करायचा असे ठरले होते.
यानुसार ऍम्ब्युलन्स पोलिसांच्या सापळ्याजवळ आली असता चालक सरवनन आणि वैल्लईदुरई यांनी ऍम्ब्युलन्सचे जोरात ब्रेक दाबून गाडीतून उड्या टाकल्या आणि पोलिसांच्या दिशेने पळाले.
सरवनन यांनी वीरप्पन गाडीतच असल्याची पुष्टी पोलिसांना दिली तसं पोलिसांनी चेतावणी देत वीरप्पनला शरण येण्यास सांगितले. मात्र वीरप्पन आणि त्याच्या साथीदारांनी पोलिसांवर फायरिंग सुरु केली.
पोलिसांनी प्रत्युत्तर म्हणून फायरिंग केली. पोलिसांकडून जवळपास ३३८ गोळ्या झाडल्या गेल्या, ज्यातील फक्त २ गोळ्या वीरप्पनला लागल्या. अशा प्रकारे वीरप्पनचा खात्मा करण्यात आला. या मोहिमेतील प्रमुख आयपीएस अधिकारी विजयकुमार सध्या जम्मू काश्मीर येथे राज्यपालांचे सल्लागार आहेत.
वीरप्पन हा वणियार या गुराखी समाजात जन्मलेला असल्यामुळे त्याच्या समाजासाठी आणि जंगलातील गावांसाठी तो रॉबिनहूड होता. वीरप्पनचा खात्मा झाल्यावर त्याला श्रद्धांजली म्हणून वणियारांचा पक्ष असलेल्या पीएमके या पक्षाने पक्षाचा झेंडा अर्ध्यावर आणला होता.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा