चांडेवाडी अंगणवाडीने केले शालेय पोषण आहाराचे वितरण

श्रीरामपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे लॉकडाउनच्या काळात शासनाने देऊ केले शालेय पोषण आहाराचे वितरण चांडेवाडी येथिल अंगणवाडी सेविका, मदतनीस व ग्रामपंचायत सदस्यांनी तालुका विधी सेवा समितीचे सदस्ययांच्या समवेत अन्न,धान्य,व इतर अत्यावश्यक वस्तूंचे वाटप केले.
मुंबई उच्च न्यायालयने कोरोना साथीच्या संकट काळात कोणी ही उपाशी राहू नये या याबाबत दक्षता घेण्याचे आदेश विधी प्राधिकरणला पारित केले आहेत.

त्यामुळे या आदेशाची अंबलबाजवणी करण्याचे हेतूने व त्याचबरोबर श्रीरामपूर तालुका विधी सेवा समितीचे अधेक्ष तथा जिल्हा सत्र न्यायाधीश सलीम यांचे सुचने प्रमाणे कोरोना संक्रमनापासून बचावासाठी जनजागृती करण्याचे काम तालुका विधी सेवा समितीचे सदस्य रविंद्र हाळनोर करत असताना यांनी फत्याबाद येथील चांडेवाडी अंगणवाडी येथे सोसियल डिस्टटिंगचे पालन करून अंगणवाडी सेविका कौशल्या पावले, मदतनीस लक्ष्मी बोरकर, ग्रामपंचायत सदस्या शिला संजय हाळनोर यांच्या समवेत शल्य पोषण आहाराचे वाटप केले.
यावेळी तालुका विधी सेवा समितीचे रविंद्र हाळनोर, फत्याबाद ग्रामपंचायतच्या विदयमान सदस्या शिला संजय हाळनोर, अंगणवाडी सेविका कौशल्या पावले, मदतनीस लक्ष्मी बोरकर, दत्तात्रय थोरात, शिवाजी बोरकर, शरद थोरात, योगेश सातकर, बंटी बोरकर, रघुनाथ पावले, सजबा थोरात आदी उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी – दत्तात्रय खेमनर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा