Harbhajan Sing: आयुष्यात मला श्रीसंत सोबत झालेली घटना बदलायची आहे.

IPL 2008 Memorable moments
आयुष्यात मला श्रीसंत सोबत झालेली घटना बदलायची !

IPL 2008 Memorable moments: 2008 सालचा नव्याने सुरू आयपीएल हंगाम. नव्याने सुरू झालेल्या या स्पर्धेने त्यावेळी चाहत्यांना भुरळ घातली होती. आयपीएलचा पहिला हंगाम असल्याने अनेक चाहत्याना ब्रैंडन मैक्कुलमचं पहिल्या सामन्यातलं शतक,राजस्थान रॉयल्सने जिंकलेली पहिली ट्रॉफी आठवत असेल. पण याच हंगामात एक क्षण असा देखील घडला होता जो आजही चाहत्यांच्या कानावर पडला तरी हजभन सिंगच नाव आठवत. तो क्षण म्हणजे हरभजन सिंग आणि श्रीसंतच्या यांच्यातील वाद !

आयपीयल 2008 साली 10 वा सामना किंग्स इलेव्हन पंजाब आणि मुंबई इंडियन्स यांच्यात मोहली स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. त्यावेळी सामन्यानंतर मुंबई इंडियन्सच्या हरभजन सिंगने पंजाब संघाकडून खेळणाऱ्या श्रीसंतच्या कानशिलात लागावली होती. ज्याची क्रिकेटच्या वर्तुळात तूफान चर्चा झाली होती. यानंतर मुंबईच्या हरभजन सिंगवर चाह्यांनी टीका देखील केली होती, एवढेच नव्हे तर भज्जीला बीसीसीआयने निलंबित देखील केले होते.

मात्र असे असले तरी हरभजनच्या मनात या संपूर्ण घटनेची सल कायम मनात आहे. त्याने म्हटले की त्याला ती घटना आयुष्यातून कायमची काढून टाकायची आहे. आश्विनच्या यूट्यूब चॅनेलमधील पॉडकास्टमध्ये हरभजन बोलत होता. यावेळी तो म्हणाला की, मला जर माझ्या आयुष्यात मला बादलायच असेल, तर मी श्रीसंतसोबत झालेली घटना बदलेल. पुढे तो म्हणाला की, जे काही घडलं, ते चुकीच होत आणि मी ते करायाला नको होत. मी त्यासाठी 200 वेळा माफी मागितली आहे.

न्यूज अनकट प्रतीनिधी, प्रथमेश पाटणकर