भारतीय संघाच्या T20 World Cup च्या वेळापत्रकात बदल

पुणे, 13 ऑक्टोंबर 2021: टीम इंडिया T20 वर्ल्ड कपपूर्वी  2 सराव सामने खेळणार आहे. पहिला सामना 18 ऑक्टोबरला तर दुसरा सामना 20 ऑक्टोबरला होणार असून पहिला सामना इंग्लंड आणि दुसरा ऑस्ट्रेलिया संघाविरोधात खेळवला जाणार होता. पण आता  विश्वचषकातील भारताच्या सराव सामन्याचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. नव्या वेळापत्रकानुसार, टीम इंडिया आता 18 ऑक्टोबर ऑस्ट्रेलिया विरुद्ध सराव सामना खेळेल. तर 20ऑक्टोबर रोजी दुबईमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना खेळेल.
आधीच्या वेळापत्रकानुसार दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम भारताच्या दोन्ही सराव सामन्यांचे आयोजन करण्यासाठी तयार होते. मात्र, आता सामने दुबईतील आयसीसी अकादमी मैदानावर होणार आहेत. दरम्यान, इंग्लंड क्रिकेट संघ आता आपला पहिला सराव सामना पाकिस्तानविरुद्ध 18 ऑक्टोबर रोजी अबुधाबी येथील शेख झायेद स्टेडियम नर्सरी 1 मध्ये खेळणार आहे. त्यांचा दुसरा सराव सामना 20 ऑक्टोबर रोजी अबुधाबीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध होईल.
टी 20 विश्वचषकासाठी भारत तयार
क्रिकेट जगतातील सर्वात मनोरंजनात्मक स्पर्धा असणारा टी-20 विश्वचषक 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान यूएईमध्ये होणार आहे. आता स्पर्धेला काही काळच शिल्लक राहिल्याने जगभरातील देश संघ बांधणीमध्ये व्यस्त आहेत. जवळपास सर्वच देशांनी आपले अंतिम खेळाडू जाहीर केले आहेत. भारताने संघ जाहीर केला असून माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला संघाचा मेन्टॉर म्हणून नेमण्यात आलं आहे. धोनीला हे पद सोपवत भारताने एक नवा डाव खेळला असून सर्वांचे लक्ष भारताच्या विश्वचषक कामगिरीकडे लागले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा