चार मुलं होऊनही जोडले प्रेमसंबंध

31

उत्तर प्रदेश (वृत्त संस्था) : मला माझा पती आणि माझ्या चार मुलांपेक्षा तुच जास्त आवडतो, असे म्हणून विवाहितेने विक्रेत्यासोबत प्रेमसंबंध निर्माण केले. दोघांनी मिळून पतीचा खून केला आणि मृतदेह नदी फेकून दिला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटकही केली.

उत्तर प्रदेशातील सिकंदरा येथील राधा नगरमध्ये वास्तव्यास असणारे हरिओम सिंह काही दिवसांपासून बेपत्ता होते. याबाबतची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तपास सुरू केल्यानंतर हरिओम यांची पत्नी बबलीवर संशय आला. तिला ताब्यात घेतल्यानंतर तिने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करून पतीचा मृतदेह यमूना नदीत फेकून दिला.असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी बबली व तिचा प्रियकर कमलला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिओम (वय ३६) व बबलीचा १७ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. दोघांना चार मुले आहेत. विक्रेता असलेल्या कमलसोबत बबलीचे प्रेमकरण सुरू झाले. याबाबतची माहिती हरिओमला समजली होती. आपल्या प्रेमाबद्दल पतीला समजले आहे, परंतु मला पती व मुलांपेक्षा तुच जास्त आवडतो.
मला तुझ्यासोबतच राहायचे आहे, असे बबली कमलला म्हणाली. त्यानंतर या दोघांनी मिळून हरिओमचा गळा दाबून खून केला व मृतदेह नदीत फेकून दिला. अधिक तपास पोलीस करीत आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा