आमदार अमनमणि यांच्यावर गुन्हा दाखल, लॉकडाउनचे केले उल्लंघन

उत्तराखंड, दि. ४ मे २०२० : उत्तराखंडच्या टिहरी जिल्ह्यात उत्तर प्रदेशच्या अपक्ष आमदार अमनमणि त्रिपाठी यांच्याविरूद्ध खटला दाखल करण्यात आला आहे. लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे वडील, दिवंगत आनंदसिंग बिष्ट यांच्या पितृ कार्याच्या नावावर या नियमांकडे दुर्लक्ष केले गेले आहे.

आमदार त्रिपाठी ११ जणांसह चमोलीला पोहोचले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे वडील स्वर्गीय आनंदसिंग बिष्ट यांचे पितृ कार्य पूर्ण करण्यासाठी त्यांनी परवानगी मागितली होती. उत्तराखंडचे अतिरिक्त मुख्य सचिव ओमप्रकाश यांनी ११ जणांना परवानगी दिली होती. देहरादून ते चमोलीपर्यंत अमनमणि त्रिपाठी यांनी पूर्ण प्रोटोकॉल दिला.

चमोलीत एसडीएमशी गैरवर्तन

मात्र तीन गाड्यांसहित चमोलीला पोहोचलेल्या अमनमणि त्रिपाठी यांनी एसडीएम कर्णप्रयागशी गैरवर्तन केले आणि त्यानंतर हे प्रकरण माध्यमांपर्यंत आले. असा आरोप केला जातो की अमनमणि त्रिपाठी यांनी गौचरमधील डॉक्टर आणि स्थानिक प्रशासनातील अधिकाऱ्यांशी गैरवर्तन केले आणि दम दिला.

कर्णप्रयागचे एसडीएम सांगतात की अमनमणि त्रिपाठी हे इतरांसह युपीहून आले होते. त्याच्याकडे ३ वाहने होती. त्यांना गौचर बॅरियर येथे थांबविण्यात आले. त्यांना थांबवून देखील बॅरियर ओलांडून ते पार करुन कर्णप्रयाग गाठले. त्यांनी डॉक्टरांशी वाद घातला आणि स्क्रिनिंगमध्ये सहकार्य केले नाही. बरीच समजूत दिल्यानंतर ते परत आले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा