रेशनिंगच्या धान्याचा काळाबाजार करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

बारामती, दि. २२ जून २०२० : लाॅकडाऊनच्या काळात गोरगरिबांसाठी सरकारने दिलेला गहू-तांदुळ काळ्या बाजारात विक्रीसाठी नेला जात असल्याचा धक्कादायक प्रकार बारामती  तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे उघडकीस आला असूून याप्रकरणी दोन जणांविरोधात वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील रेशनिग धान्याचा काळ्या बाजाराने खरेदी केलेला रेशनचा माल खुल्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणारा टेम्पो उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने शुक्रवार दि.१९ दुपारी निरा बारामती मार्गावर होळ (ता.बारामती) येथील आठफाटा भागात पकडला.

यामध्ये १८ हजार ७०० रूपये किंमतीच्या गव्हाच्या १७ पिशव्या, ५२ हजार ५०० रूपये किंमतीच्या तांदळाच्या ३५ पिशव्या एम एच ४२ एम ६३०८ यानंबरच्या टेम्पोत भरून वडगाव निंबाळकर वरून तरडगावच्या दिशेने घेऊन चालला होता.

याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्याकडे तक्रारी आल्या होत्या. शहानिशा करण्यासाठी सापळा लावला असता निरा-बारामती मार्गावर रेशनचा माल घेऊन जाताना असताना हा टेम्पो रंगेहाथ पकडण्यात आला . माल रेशनिंगचा असल्याची खात्री करण्यासाठी नायब तहसीलदार महादेव भोसले उपस्थित होते. सहाय्यक पोलिस निरिक्षक सोमनाथ लांडे, तलाठी रविंद्र कदम, कोतवाल बाळासो करचे यांच्या समक्ष पंचनामा करून टेम्पो सह २ लाख ७० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

टेम्पोचालक शशिकांत कदम रा.चोपडज ता. बारामती आणि दुकानदार शशिकांत शहा रा. वडगाव निंबाळकर ता. बारामती यांच्यावर वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा