भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी आठ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

भीमा कोरेगाव , १० ऑक्टोबर २०२० : भीमा कोरेगाव इथं १ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या हिंसाचार प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा, आनंद तेलतुंबडे, आणि दिल्ली विद्यापीठातले सहयोगी प्राध्यापक हनी बाबू यांच्यासह आठ जणांविरुद्ध एनआयए ने अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं काल आरोपपत्र दाखल केलं.

मुंबईतल्या विशेष न्यायालयापुढं दाखल केलेल्या या आरोप पत्रात, भिमा कोरेगाव हिंसाचारात हात असल्याचा आरोप या सर्वांवर ठेवला आहे. मानव अधिकार कार्यकर्ते फादर स्टॅन स्वामी, ज्योती जगताप, सागर बोरखे, आणि रमेश गायचोर यांचीही नावं या आरोप पत्रात आहेत. याशिवाय मिलिंद तेलतुंबडे यांचंही नाव आरोपी म्हणून आहे.

मात्र, ते फरार असल्याचं एनआय़एच्या प्रवक्त्यानं सांगितलं. फादर स्वामी यांना काल संध्याकाळी रांची इथं त्यांच्या निवास्थानी एनआयएनं त्यांना अटक केली आणि आज न्यायालयापुढं हजर केलं. न्यायालयानं त्यांना येत्या २३ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा