आयपीएल इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात जास्त धावांचा पाठलाग, राजस्थान रॉयल्स संघ ४ गडी राखून विजयी

दुबई, २८ सप्टेंबर ,२०२०: काल दिनांक २७ सप्टेंबर,२०२० रोजी झालेला आयपीएल २०२० मधील ९ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने किंग्ज इलेव्हन पंजाब संघा विरुद्ध ४ गडी राखून विजय मिळवत आयपीएल इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात जास्त धावांचा पाठलाग करण्याचा विक्रम मोडीत काढला आहे.या सामन्यात अनेक उतार चढाव आले. प्रेक्षकांना शेवटच्या षटका पर्यंत माहीत नव्हते की सामना कोणाच्या झोळीत जाणार आहे.

सामन्यात, राजस्थान रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पंजाब संघाला फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले. फलंदाजीला उतरलेल्या पंजाबच्या फलंदाजांनी पंजाब संघाला धमाकेदार सुरुवात करून दिली. के.एल. राहुल आणि मयंक अगरवाल यांच्या बॅटला चेंडू स्पर्श झाला की तो सरळ सीमा रेषेच्या बाहेरच जात होता. अशातच मयंक अग्रवाल याने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी करत शतक झळकावले. त्याने ५० चेंडूत १०६ धावांची खेळी केली . तसेच मागील सामन्यात शतक झळकावणारा खेळाडू के.एल. राहुल याने ५४ चेंडूत ६९ धावा केला.त्यानंतर पुरण च्या २५ आणि मॅक्सवेल च्या १३ धावांच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने २० षटकांच्या समाप्तीनंतर २ विकेट्स गमावत २२३ धावा केल्या.

२२४ धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्स संघाला हवी तशी सुरुवात मिळाली नाही. संजू सॅमसन याला साथ मिळाली ती कर्णधार स्टीव स्मिथची , स्मिथ ने २७ चेंडूत ५० धावा ठोकल्या. त्यानंतर संजू सैमसन याने एकहाती झुंज देत ८५ धावा केल्या. वरच्या क्रमांकावर फलंदाजी साठी आलेल्या तेवतिया ने सुरुवातीच्या १९ चेंडूत फक्त १४ केल्या. यानंतर असे वाटू लागले की, तेवतीया राजस्थान च्या पराजायचे कारण ठरणार की काय?. परंतु १८ व्या षटकात कोट्रेलला ६ चेंडूंमध्ये ५ षटकार मारत तेवातिया ने सामना आपल्या झोळीत टाकून घेतला. आणि पराजयाचं कारण न बनता विजयचा शिल्पकार बनला. त्याने ३१ चेंडूत ५३ धावांची खेळी केली. पंजाब संघाकडून गोलंदाजी करतांना मोहम्मद शमी याला ४ षटकात ५३ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. तसेच एम.अश्विन, निशम आणि कॉट्रेल यांना प्रत्येकी एक एक विकेट्स मिळाल्या. हा सामना राजस्थान रॉयल्स ने ४ गडी राखून जिंकला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा