छ. संभाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिर

पुणे: ११ मार्च हा दिवस छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिवस म्हणून सर्व महाराष्ट्रात स्मरण केला जातो . स्वराज्य रक्षिण्यासाठी महाराजांनी ज्याप्रमाणे आपल्या रक्ताने ही भूमी लाल केली त्याला अनुसरून दरवषी संभाजी ब्रिगेड, अखिल भारतीय शिवमोहोत्सव समिती, मराठा सेवा संघ आणि राजर्षी शाहू महाराज शोषल फाऊंडेशन यांच्या तर्फे डेक्कन येथे रक्तदान शिबिर आयोजित केले जाते.

डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्प हार अर्पण करून हा कार्यक्रम करण्यात आला. महाराजांच्या मृतिदिनाचे औचित्य साधत सामाजिक कार्य घडवून आणणे हे कौतुकास्पद आहे. याप्रसंगी समिती अध्यक्ष विकास पासलकर, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष संतोष शिंदे, शहराध्यक्ष प्रशांत धुमाळ, तालुका अध्यक्ष गणेश चराटे, जिल्हा सचिव महादेव मातेरे, वाहतूक संघटनेचे अध्यक्ष मंदार बहिरट, शहराध्यक्ष राहुल टेंगळे, विनायक घुले, चित्रपट आघाडीचे अध्यक्ष प्रकाश धिंडले, पुरंदर तालुका अध्यक्ष सागर पोमन, राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशनचे कैलास वाडगुळे आदी उपस्थित होते.

मुंबईत मंत्रालयामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा नाही त्या कारणास्तव मंत्रालयांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे प्रतिमा बसवण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात येणार आहे. पासलकर म्हणाले, “दरवर्षी आम्ही छत्रपती संभाजी महाराज स्मृति दिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करणार आहोत. यावेळेस रक्तदात्यांना आम्ही संभाजी महाराज लिखित ‘बुधभूषण’ हा ग्रंथ भेट देणार आहोत.”

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा