पुणे:खडकवासला धरण परिसरात सामसूम असणाऱ्या ठिकाणी काही जण दारू पीऊन सिंहगड रस्ता अथवा एनडीए रस्त्याने घरी जाणाऱ्या महिला-मुलींची छेडछाड काढतात.अशीच एक घटना शुक्रवारी (ता. १३) रात्री आठ ते नऊ या दरम्यान शिवणे येथील राजर्षी शाहू बॅंकेच्या परिसरात घडली . त्यानंतर या परिसरात महिला किंवा मुलींनी एकटे जाऊ नये. असा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाला. खडकवासला, शिवणे, सिंहगड रस्ता परिसरात महिला व मुलींच्या छेडछाडीसंदर्भात सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मेसेजवरून पोलिस यंत्रणा अलर्ट झाली आहे. स्थानिक पातळीवर पोलिसांनी कडक चौकशी सुरू केली आहे; मात्र अशा प्रकाराबाबत अद्याप कोणीही तक्रार दिलेली नसल्याचे उत्तमनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील पंथरकर यांनी सांगितले.
पोलिस निरीक्षक पंथरकर म्हणाले, ‘अशा प्रकारचा मेसेज आम्हाला मिळाला आहे. त्यानंतर आम्ही परिसरातील रस्त्यांवर गस्त वाढविली आहे. आमची चौकशी सुरू आहे.