चेन्नई सुपर किंग्ज (CSK) चा 13 धावांनी पराभव, चालली नाही धोनीची जादू

RCB vs CSK, 5 मे 2022: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) ने बुधवारी इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) चा 13 धावांनी पराभव केला. महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपद स्वीकारल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचा हा पहिलाच पराभव आहे. आरसीबीने सलग तीन पराभवांनंतर विजय मिळवला आहे, अशा स्थितीत आरसीबीच्या प्लेऑफमध्ये जाण्याची आशा कायम आहे.

या सामन्यात बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना 173 धावा केल्या होत्या, मात्र चेन्नई सुपर किंग्जला 20 षटकात केवळ 160 धावा करता आल्या.

चेन्नई सुपर किंग्जला शेवटच्या षटकात विजयासाठी 31 धावांची गरज होती, जी अशक्य होती. शेवटच्या षटकात चेन्नईचा संघ केवळ 17 धावा करू शकला, ज्यामध्ये दोन षटकार आणि एक चौकार लेगबायचा समावेश होता. अशा स्थितीत चेन्नईचा 13 धावांनी पराभव झाला. या सामन्यात कर्णधार महेंद्रसिंग धोनी केवळ 2 धावा करू शकला आणि त्याची विकेट पडताच CSK च्या आशाही भंगल्या.

चेन्नई सुपर किंग्जचा डाव

पहिली विकेट – ऋतुराज गायकवाड 28 धावा, 54/1
दुसरी विकेट – रॉबिन उथप्पा 1 धाव, 59/2
तिसरी विकेट – अंबाती रायडू 10 धावा, 75/3
चौथी विकेट – डेव्हन कॉनवे 56 धावा, 109/4
पाचवी विकेट – रवींद्र जडेजा 3 धावा, 122/5
सहावी विकेट – मोईन अली 34 धावा, 133/6
7वी विकेट – एमएस धोनी 2 धावा, 135/7

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू डाव – 173/8

पहिली विकेट – फाफ डु प्लेसिस 38 धावा, 62/1
दुसरी विकेट – ग्लेन मॅक्सवेल 3 धावा, 76/2
तिसरी विकेट – विराट कोहली 30 धावा, 79/3
चौथी विकेट – रजत पाटीदार 21 धावा, 123/4
पाचवी विकेट – महिपाल लोमरोर 42 धावा, 155/5
6वी विकेट – वानिंदू हसरंगा 9 धावा, 155/6
सातवी विकेट – शाहबाज अहमद 1 धाव, 157/7
आठवी विकेट – हर्षल पटेल 0 धावा, 171/8

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर प्लेइंग-11: फाफ डू प्लेसिस, विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक, महिपाल लोमरोर, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, जोश हेजलवुड

चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग-11: ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, मोईन अली, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, एमएस धोनी, रवींद्र जडेजा, ड्वेन प्रिटोरियस, सिमरजीत सिंग, मुकेश चौधरी, महिश तिक्षन

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा