चैन्नई संघाला मिळाला नवा प्रायोजक?……

नवी दिल्ली, ४ फेब्रुवरी २०२१: आयपीएलचा हंगाम २०२० नुकताच पार पडला आणि त्याला अजून महिने होत नाही तो पर्यंतच आता २०२१ च्या हंगामाच्या तयारीला सुरवात झाली आहे. ज्यामधे अनेक संघांनी आपापल्या खेळाडूंना रिर्टन केले आहे. तर काही जुने खेळाडू ज्यांचं वर्षानुवर्षे संघाबरोबर राहीले होते अश्यांना लिलावासाठी मोकळे केलं आहे.

नवीन स्पाॅन्सर?…..

आयपीएल मधे अनेक बड्या कंपन्या फायनान्स करतात. तसेच नवनवीन स्पाॅन्सर या निमीत्ताने संघाला आणि फ्रेंचाइजी ला मिळत आसतात. आता आयपीएल मधे अशाच एका संघाला नवीन स्पाॅन्सर मिळाल्याच्या चर्चाला उधाण आले आहे. आणि हि माहिती सूत्रांकडून समजली आहे.

आयपीएलचा सर्वात दमदार चैन्नई सुपर किंग्स संघाला नवा प्रायोजक भेटल्याची बातमी समोर येत आहे.सूत्रांनुसार, ‘चेक रिपब्लिकची मोटार कंपनी स्कोडाने चैन्नई सोबत मुख्य प्रायोजक म्हणून करार केला आहे. ७५ कोटीचा हा करार पुढील तीन वर्षे असेल.’

मात्र सीएसके व्यवस्थापनाकडून याबाबतची अधिकृत घोषणा झाली नाही. या आधी चैन्नईने २०१८ ते २०२० या तीन वर्षासाठी “मुथूट फायनान्स” कंपनीशी ६५ कोटींचा करार केला होता. तर रिब्लिकचा करार जर चैन्नईने केला.तर चैन्नईच्या पिवळ्या जर्सीवर नव्या प्रायोजकाची जाहिरात दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि चैन्नई च्या फॅन्ससाठी तो एक वेगळा अनुभव देणारा क्षण आसेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा