चेन्नई संघाच्या अडचणीत अजूनही चढ उतार, आता या खेळाडूनं घेतली माघार…

यूएई, ४ सप्टेंबर २०२०: यंदाचे आयपीएल हे युएईत होणार असून या लोकप्रिय लीगवर सध्या कोरोनाचे ग्रहण लागले होते. तर चेन्नई सुपर किंग्स या संघाला याचे परिणाम जास्त प्रमाणात होताना दिसत आहे. कोरोनाच नाही तर इतर खेळाडू हे दुसऱ्या कारणासाठी यदांच्या हागामातून माघार घेत आहेत.

चेन्नई सुपर किंग्ससाठी आनंदाची बातमी

चेन्नईच्या संघातील मुख्य गोलंदाजासह १२ अन्य स्टाफला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्या दोन चाचण्या या नुकत्याच झाल्या, ज्यामधे त्यांचा अहवाल हा निगेटिव्ह आला आहे. तर संघातील हे खेळाडू  लवकरच मैदानावर सराव करण्यासाठी उतरणार आहेत.

चेन्नई संघाला आणखी एक धक्का

फिरकीपटू हरभजन सिंगने आयपीएल मधून माघार घेतली आहे. हरभजन सिंगने माघार वैयक्तिक कारणामुळे घेतल्याचे समजत आहे. यामुळे चन्नेई संघाच्या अडचणीत वाढ होतानाच दिसत आहे. याआधी सुरेश रैना देखील आयपीएल मधून माघार घेऊन भारतात परतला आहे. तर बीसीसीआयच्या दोन आधिकाऱ्यांना देखील कोरोना झाल्याचे वृत्त स्वतः बीसीसीआयने दिले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा