मुंबई: रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावणारी कोनेरू हम्पी ही भारताची पहिलीच महिला बुद्धिबळपटू ठरली आहे.
महिला जागतिक रॅपिड बुद्धिबळ चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या कोनेरू हम्पीने चीनच्या लेई टिंगजीविरुद्ध आर्मेगेडन गेम बरोबरीत सोडवली.
कोनेरूने चीनच्या टांग झोंगियाविरुद्ध पुनरागमन करीत १२ व्या अंतिम फेरीत विजय मिळवला. त्यानतंर तिला टिंगजीविरुद्ध टायब्रेकरवर खेळावं लागलं. कोनेरू हम्पी पहिल्या फेरीत पराभूत होत, दुसऱ्या फेरीनंतर १२ व्या फेरीपर्यंत हम्पीने पुनरागमन करत बरोबरी केली.तिने १२ व्या फेरीअखेर ९ गुण मिळवले. हम्पी आणि टिंगजी यांचे गुण समान झाल्यानंतर विजेतेपदाचा निर्णय आर्मेगेडोन गेम पद्धतीनं निर्णय घेण्यात आला. यामध्ये हम्पीने विजेतेपदाला गवसणी घातली. तिचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी अभिनंदन केलं आहे.
याबाबत हम्पीने सांगितले की, हे माझं पाहिलंच विश्वविजेतपद असून यामुळे मी खूप आनंदी आहे. पहिल्या फेरीत पराभव झाल्यानंतर दुसऱ्या फेरीध्ये मला पुनरागमन करता आलं. पुढच्या फेऱ्या अवघड होत्या. तरीही विजेतेपद मिळालं. शेवटच्या क्षणी माझी स्थिती चांगली असल्याने मी विजेतेपद मिळवू शकले.
दरम्यान, रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावणारी हम्पी भारताची पहिलीच महिला ठरली आहे. रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावणारी कोनेरू हम्पी ही भारताची पहिलीच महिला बुद्धिबळपटू ठरली आहे.
महिला जागतिक रॅपिड बुद्धिबळ चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या कोनेरू हम्पीने चीनच्या लेई टिंगजीविरुद्ध आर्मेगेडन गेम बरोबरीत सोडवली.
कोनेरूने चीनच्या टांग झोंगियाविरुद्ध पुनरागमन करीत १२ व्या अंतिम फेरीत विजय मिळवला. त्यानतंर तिला टिंगजीविरुद्ध टायब्रेकरवर खेळावं लागलं. कोनेरू हम्पी पहिल्या फेरीत पराभूत होत, दुसऱ्या फेरीनंतर १२ व्या फेरीपर्यंत हम्पीने पुनरागमन करत बरोबरी केली.तिने १२ व्या फेरीअखेर ९ गुण मिळवले. हम्पी आणि टिंगजी यांचे गुण समान झाल्यानंतर विजेतेपदाचा निर्णय आर्मेगेडोन गेम पद्धतीनं निर्णय घेण्यात आला. यामध्ये हम्पीने विजेतेपदाला गवसणी घातली. तिचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी अभिनंदन केलं आहे.
याबाबत हम्पीने सांगितले की, हे माझं पाहिलंच विश्वविजेतपद असून यामुळे मी खूप आनंदी आहे. पहिल्या फेरीत पराभव झाल्यानंतर दुसऱ्या फेरीध्ये मला पुनरागमन करता आलं. पुढच्या फेऱ्या अवघड होत्या. तरीही विजेतेपद मिळालं. शेवटच्या क्षणी माझी स्थिती चांगली असल्याने मी विजेतेपद मिळवू शकले.
दरम्यान, रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावणारी हम्पी भारताची पहिलीच महिला ठरली आहे.