छावा चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद ; पहिल्याच दिवशी कमावले ‘इतके’ कोटी

22

chhaava box office collection frist day : छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास उलघडून सांगणारा लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘छावा’ चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. विकी कौशल व रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना यांच्या मुख्यभूमिकेत असलेल्या या चिटपटाची सगळीकडे मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे. चित्रपटातील एका सीनमुळे वाद झाला होता. परंतु त्या वादाचा चित्रपटावर कोणातच परिणाम झालेला दिसत नाहीये चित्रपट रिलीज झाल्यानंतर याला प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद देत चिटपटाने ग्रँड ओपनींग केली आहे.

विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांचा छावा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपट गृहात मोट्या प्रमाणात गर्दी करत आहेत. चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपट पाहिल्या नंतर प्रेक्षक भारावून जाऊन आपली मते सोशल मिडियावर शेअर करत आहेत. यावरूनच समजते की चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आहे. चला तर जाणून घेऊ चित्रपटाने पहिल्या दिवशी कीती कमाई केली आहे.

पहिल्या दिवसाची कमाई :

चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच अॅडव्हान्स बुकिंगमधून चित्रपटाने चांगली कमाई केली होती. आता चित्रपट रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवसाची आकडेवारी समोर आली आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी चांगले यश मिळवत ३१ कोटींची कमाई केली आहे. या आकडेवारीत अजून वरचढ सुद्धा होऊ शकते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रथमेश पाटणकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा