छत्रपती संभाजी साहित्य संमेलन १२ मार्च रोजी सासवडला होणार,दशरथ यादव यांची माहिती

पुणे,१९ फेब्रुवारी २०२४ : राज्यस्तरीय पंधरावे छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन दि. १२ मार्च २०२४ रोजी सासवड येथे होणार आहे, अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद व जगदगुरु तुकोबाराय साहित्य परिषद यांच्या वतीने साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संमेलनाचे मुख्य प्रवर्तक व ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी दिली.

साहित्य संमेलनात उद्घाटन समारंभ, कथाकथन, पुस्तक प्रकाशन, ग्रथदिंडी, नाट्यप्रयोग, कविसंमेलन असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.या संमेलनात राज्यभऱातून लेखक, कवी मोठ्या प्रमाणावर सहभागी होणार असून, संमेलनात ग्रंथदिंडी, पुस्तक प्रकाशन, पुरस्कार वितरण, परिसंवाद, कथाकथन,. कविसंमेलन, नाट्यप्रयोग उद्घाटन समारंभ असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.

संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सजंय जगताप, माजी मंत्री विजयबापू शिवतारे, माजी आमदार अशोकराव टेकवडे, बाबाराजे जाधवराव , विजयराव कोलते, सुदामअप्पा इंगळे, डॉ दिगंबर दुर्गाडे आदी उपस्थित राहणार आहेत.
साहित्य संमेलनाच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीला परिषदेचे राजाभाऊ जगताप, गंगाराम जाधव, सुनील लोणकर, दत्ता भोंगळे, संजय सोनवणे, दिपक पवार, अरविंद जगताप, दत्ता कड, बहुजन हक्क परिषदेचे सुनील धिवार, विजय तुपे, डॉ भालचंद्र सुपेकर आदी उपस्थित होते. साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी कवी, लेखक, कथाकार, कलावंत यांनी 9881098481 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा