छत्रपती शिवाजी महाराजांची ‘जगदंबा तलवार’ महाराष्ट्रात येणार, राज्याचे सांस्कृतिक मंत्री इंग्लडला जाणार

मुंबई, १८ मे २०२३ : छत्रपती शिवाजी महाराजांची ब्रिटनमध्ये असलेली जगदंबा तलावर भारतात आणण्यासाठी राज्य सरकारने जोरात हालचाली सुरु केल्या आहेत. राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार अधिकाऱ्यांसह ही तलवार आणण्यासाठी पुढील महिन्यात ब्रिटन दौरा करणार आहेत.ब्रिटन सरकारजवळ या संदर्भात अंतिम टप्प्यात बोलणे सुरु आहे.

महाराष्ट्राचा आणि तमाम मराठी माणसाचा स्वाभिमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची ब्रिटनमध्ये असणारी जगदंबा तलवार आणि वाघ नखे महाराष्ट्रात येणार आहे. ही तलवार आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. यासाठी जून महिन्यात सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार अधिकाऱ्यांसह ब्रिटनमध्ये जाणार आहे. ही तालावर आनंन्या संदर्भात सामंजस्य करारावर सह्या करण्यात येणार आहे.

छात्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने राज्यात शंभरपेक्षा जास्त कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, शिवाजी महाराजांचे वंशज आणि अन्य नागरिकांना बोलवण्यात येणार आहे. शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षपूर्तीचा महोत्सव राज्य शासन राज्यभर मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहे. त्या अनुषंगाने महाराजांची जगदंबा तलवार आणि वाघनखे ब्रिटनकडून आणण्यात येणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा