छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार ‘जगदंबा’ वर्षभरासाठी येऊ शकते भारतात

पुणे, १३ एप्रिल २०२३: छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीन लोकप्रिय तलवारींपैकी एक ‘जगदंबा’ लवकरच युनायटेड किंगडम (यूके) येथून वर्षभरासाठी भारतात येण्याची शक्यता आहे. वृत्तानुसार, महाराजांच्या ३५० व्या जयंती स्मरणार्थ ही तलवार संग्रहालयात ठेवली जाईल.

शिवाजी महाराजांच्या वंशजांने म्हणजेच चौथे शिवाजी यांनी १८७५-७६ मध्ये भारतभेटीच्या वेळी अल्बर्ट एडवर्ड म्हणजेच तत्कालीन प्रिन्स ऑफ वेल्स आणि नंतरचे सातवे राजा एडवर्ड यांना ती तलवार भेट दिली होती. त्यावेळी चौथे शिवाजी फक्त ११ वर्षांचे होता. पण २०२२ च्या एका वृत्तपत्राच्या अहवालानुसार, ही तलवार भेटवस्तूऐवजी ब्रिटिशांनी जबरदस्तीने काढलेली होती. चौथ्या शिवाजी महाराजांना त्या काळातील इतर अनेक राजांप्रमाणे तलवार “भेट” देण्यास भाग पाडले गेले.

राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगीतले की, “लंडनमधील सेंट जेम्स पॅलेसमधून तलवार घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राशी चर्चा सुरू केली आहे”. सुधीर मुनगंटीवार हे स्वतः ब्रिटनमधील अधिका-यांशी चर्चा करण्यासाठी मे महिन्यात लंडनला जाण्याची शक्यता आहे. या संदर्भात यूकेचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी वैयक्तिकरित्या संपर्क साधून ती तलवार महाराष्ट्रात किमान एक वर्ष ठेवण्याची इच्छा असल्याच त्यांनी सांगितल. २०२४ मध्ये शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्धापन दिनानिमित्त जगदंबा तलवार परत मिळाल्यास हा अभिमानाचा क्षण असेल. एकदा तलवार मिळाल्यानंतर राज्यभर कार्यक्रमांचे आयोजन करणार असल्याच देखिल श्री. मुनगंटीवार म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनीधी : केतकी कालेकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा