भवानीनगर: बॉयलर चिकन खाल्याने करोना होत असल्याची अफवा पसरल्याने भवानीनगर येथे बॉयलर कोंबड्यांची गाडी लावून केवळ दहा रुपयांमध्ये एक कोंबडी विक्री करण्यात आल्याने या भागातील कोंबडी व्यवसायिक आणि शेतकरीही आर्थिक अडचणीत सापडला आहे.
भवानीनगर (ता. इंदापूर) याठिकाणी व्यापार पेठ मध्ये बॉयलर कोंबड्यांची भरलेली गाडी उभा करून व मोठ्याने ओरडून सांगत व्यापाऱ्यांनी दहा रुपयाला एक कोंबडी व पाच रुपयाला पाच कोंबड्या अशाप्रकारे गाडीमध्ये आणलेल्या बॉयलर कोंबड्यांची विक्री केली. या अगोदर बॉयलर कोंबडी चा दर हा एका कोंबडीस साधारण १७० रुपये ते १८० रुपये असा होता. परंतु बॉयलर कोंबडी खाल्ल्याने करोना रोगाची लागण होत असल्याने कोंबडी विक्री व्यवसाय करणाऱ्यांवर ही वेळ आलेली आहे. ही अफवा पसरवली जात आहे.
साधारण एका बॉयलर कोंबडी चे वजन अडीच ते पावणेतीन किलो भरत असून ही कोंबडी १७० रुपयाला ते १८० रुपयाला विकली जात होती. ती आज दहा रुपयाला विकली जात असल्याने कोंबडी विक्री कर्नारया व्यापार्या बरोबर ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पोल्ट्री फार्म केलेले आहेत त्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
करोना व्हायरस हा ३५ ते ३६ अंश डिग्री सेल्सिअस ला राहत नाही व बॉयलर कोंबडी ही शिजवून खाल्ली जात असल्याने ती शिजवता वेळीचे टेम्परेजर(तापमान) हे शंभरच्या पुढे गेलेले असल्याने या बॉयलर कोंबडी पासून करोना होत नसल्याचे इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे ही सांगण्यात आलेले आहे. तरी देखील बॉयलर कोंबडी बाबत अजूनही नागरिकांच्या मनातील भीती निघालेली नसल्याने सध्यातरी बॉयलर कोंबडी खरेदी करण्यास नागरिक धजावत नाहीत. परंतु या करोना रोगाच्या भीतीने कंपनीने देखील कोंबडी खाद्य देणे बंद केले असून बॉयलर कोंबडी तसेच पिल्ले देणेही कंपनीने ठप्प केलेले आहे.
या सर्व घडलेल्या घटनेमुळे भवानीनगर व सणसर परिसरातील बॉयलर कोंबडी व्यवसायिक व पोल्ट्री फार्म शेतकरी व्यवसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. भारतीय खाद्य सुरक्षा एव मानक प्राधिकरण यांनीही रासायनिक दृष्ट्या हे प्रु केले आहे की बॉयलर कोंबडी खाल्ल्याने करुणा या रोगाची लागण होत नाही. परंतु या करोना रोगाच्या भीतीने मात्र बॉयलर कोंबडी विक्री व्यवसाय अडचणीत सापडलेला आहे.
चौकट – कायमस्वरूपी जे व्यवसायिक बॉयलर कोंबडी विकण्याचा व्यवसाय करतात त्यांच्याकडे अगोदरच साधारण 92 रुपये ते शंभर रुपये दराने बॉयलर कोंबडी खरेदी केलेली असताना या करोना रोगाच्या भीतीने केवळ एक कोंबडी दहा रुपयाला विकण्याची वेळ आली आहे. यामुळे भवानीनगर सणसर भागातील बॉयलर कोंबडी विक्री करणारे व्यवसायिक व पोल्ट्री फार्म असलेले शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत…..