नवी दिल्ली: आयएनएक्स मीडिया प्रकरणात तिहार तुरुंगात माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची तब्बेत बिघडल्यानंतर त्यांना अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत (एम्स) नेण्यात आले. चिदंबरम यांना एनफोर्समेंट डायरेक्टरेट (ईडी) च्या ताब्यात तिहार जेलमध्ये ठेवले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, चिदंबरम यांनी तुरूंगात पोटदुखीची तक्रार केल्यानंतर सोमवारी सकाळी अधिकाऱ्यांनी त्यांना राम मनोहर लोहिया रुग्णालयात नेले पण संध्याकाळी त्यांना एम्समध्ये नेण्यात आले. एम्सच्या डॉक्टरांच्या टीमने म्हटले आहे की, चिदंबरमची चाचणी घेतल्यानंतर कोणतीही गंभीर समस्या समोर आले नाही.
यापूर्वी ही ऑक्टोबर मध्ये चिदंबरमकडून पोटदुखीची तक्रार आल्यानंतर त्यांना एम्समध्ये नेण्यात आले होते. सामान्यत: तिहार तुरुंगातील कैद्यांना दीन दयाल उपाध्याय रुग्णालयात तपासणीसाठी नेले जाते पण कोर्टाने आदेशात म्हटले आहे की, जर चिदंबरम यांच्या तब्येतीची तक्रार असेल तर त्यांना एम्स, राम मानेहर लाहिया हॉस्पिटल किंवा सफदरजंग रुग्णालयात नेण्यात यावे.