मुंबई २५ जून २०२१: दुसऱ्या लाटेचे सावज अजून असताना लगेच निर्बंध शिथिल करु नका , असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. अनलॅाक चार नंतर आता सगळीकडे जनतेचा वावर वाढला आहे. मात्र दुसरी लाट अजून संपली नाही. तेव्हा सर्व नियम पाळा, असे त्यांनी सांगितले.
सातारा, सांगली, रायगड, कोल्हापूर, हिंगोली, सिंधुदूर्ग, रत्नागिरी या सात जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांशी त्यांनी दुरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. त्याचबरोबर तिसऱ्या येऊ घातलेल्या लाटेसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेशही दिले.
डेल्टा प्लस या विषाणूचा धोका आणि संसर्गाचे वाढते प्रमाण हा संभाव्य धोका सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याचा विचार करुन आयसीयू बेड, ॲाक्सिज, फिरते रुग्णालय इत्यादी सुविधा उभाराव्या लागतील. तसेच लोकांनी उत्साहाच्या भरात बाहेर पडून गर्दी करु नये आणि सर्व नियंमांचे पालन करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी जनतेला दिले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी : तृप्ती पारसनीस