रत्नागिरी, १७ फेब्रुवारी २०२३ : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ रत्नागिरी विभागाअंतर्गत नवीन बसचे लोकार्पण शुक्रवारी (ता. १७) स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार योगेश कदम, परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, उपमहाव्यवस्थापक श्रीनिवास जोशी, विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते.
रत्नागिरी जिल्ह्याकरिता ५० नवीन बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी नवीन बसमधून स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह ते शासकीय विश्रामगृह या मार्गाने प्रवासही केला.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : जमीर खलफे