कल्याण-डोंबिवलीत कोविड केंद्रांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

कल्याण-डोंबिवलीत, दि. २५ जुलै २०२०: डोंबिवलीत आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे हस्ते पाटीदार भवन व आसरा फाऊंडेशन येथे कोव्हिड रुग्णांसाठीआरोग्य केंद्र, त्याच प्रमाणे गौरीपाडा, कल्याण पश्चिम येथील महापालिकेच्या स्वॅब टेस्टिंग सेंटर यांचा ऑनलाईन शुभारंभ सोहळा पार पडला. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी विशेषतः मुंबई महानगर क्षेत्रात कोविडचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करा असे सांगितले.

कोरोना संकटात महाराष्ट्र शासन खंबीर आहे. वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी तसेच व्हायरस प्रसाराला अटकाव करण्यासाठी एकत्रित दर्जेदार सुविधा निर्माण करण्याबरोबरच मोठ्या प्रमाणावर ट्रेसिंग करण्यावर भर देण्यात यावा अशा सुचना व्हिडीओ कॉन्फसरींग द्वारा त्यांनी दिल्या. केवळ मोठमोठया सुविधा उभारून चालणार नाही तर योग्य पद्धतीने रुग्ण सेवा, वैद्यकीय उपचार, पुरेशी ऑक्सिजन व्यवस्था तात्काळ उपलब्ध होणे गरजेचे आहे यावर भर देण्यास सांगितले.

या संकटात आवश्यकता असेल तेथे प्रयोगशाळा तसेच आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वोतोपरी सहाय्य देण्यात येईल. कोरोनाला हरवण्यासाठी एकजुटीने त्यावर मात करु असा विश्वास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केला. कोरोनाच्या बाबत नागरिकांच्या मनातील भिती दुर करण्याबरोबरच त्यांना दिलासा देण्याबरोबरच समुपदेशन उपलब्ध करुन देण्यात यावे असेही त्यांनी सांगितले.

सध्याची कल्याण -डोंबिवलीतील परिस्थिती ही लवकरात लवकर आटोक्यात यावी यासाठी देखील त्यानी महापालिकेला आदेश दिले आहेत. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, आमदार राजू पाटील,विश्वनाथ भोईर,रवींद्र चव्हाण महापौर विनिता राणे,सभापती स्थायी समिती विकास म्हात्रे,विरोधी पक्ष नेते राहुल दामले,नगरसेवक दीपेश म्हात्रे,राजेश मोरे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांसह नगरसेवक, मनपा अधिकारी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राजश्री वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा