वन्यजीव संरक्षणाबाबतची सजगता आयुष्यभरासाठी जपण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आवाहन

मुंबई, २ ऑक्टोबर २०२० : वन्यजीव सप्ताहाच्या माध्यमातून वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनाप्रती येणारी सजगता, जाग ही केवळ सप्ताह साजरा करण्यापुरती मर्यादित न ठेवता ती आयुष्यभरासाठी जपूया, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

राज्यात १ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर या काळात वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो. त्यानिमित्तानं मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या जनतेला आणि वन्यजीव प्रेमींना शुभेच्छा दिल्या आहेत.

वन्यजीव म्हणजे केवळ वाघ नाही तर वाघ केवळ एक प्रतीक असल्याचं सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, ज्या जंगलात वाघ असतो ते जंगल पूर्ण असतं. जंगल पूर्ण असणं हे जीवसृष्टीचं एक मोठं जीवनचक्र आहे. त्याचं रक्षण करणं, त्याबद्दल जाग आणण्यासाठी या सप्ताहाचं महत्व अधिक आहे. मुंबईत जवळपास ६०० चौ.कि.मी चं आरेचं जंगल आरक्षित करण्याचा प्रस्ताव त्याच उद्देशानं आणल्याचं आणि हे जंगल आरक्षित करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

असे सप्ताह किंवा दिन साजरे करतांना त्यातील औपचारिकता काढून टाकून ते मनापासून साजरे झाले तर आयुष्याला एके वेगळी कलाटणी आणि दिशा मिळेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

न्यूज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा