मुंबईत मास्क न वापरणाऱ्या लोकांना कोणत्याही सार्वजनिक वाहनांचा उपयोग करायला बंदी

मुंबई, २ ऑक्टोबर २०२० : मुंबईत आता मास्क न वापरणाऱ्या लोकांना बस, टॅक्सी, आणि रिक्षा यांसारख्या सार्वजनिक वाहनांचा उपयोग करता येणार नाही. बृहन्मुंबई महानगर पालिकाचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

यासोबतच मॉल्स, कार्यालयं, तसंच रहिवासी सोसायट्या या ठिकाणी देखील विना मास्क असलेल्या नागरिकांना प्रवेश मिळणार नाही. कोरोना संसंर्गापासून बचाव करण्यासाठी मास्क सारख्या प्रतिबंधित उपायाचा वापर व्हावा यासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी यासाठी नागरिक, वॉर्ड कार्यालयं तसंच रिक्षा चालक संघटनेला या बाबत माहिती देण्यात येणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा