आगामी सण समारंभ साधेपणानं साजरे करण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आवाहन

मुंबई, १२ ऑक्टोबर २०२०: एकदा सुरु केलेली कोणतीही गोष्ट आपल्याला पुन्हा बंद होऊ द्यायची नाही याचा पुनरुच्चार करत जनतेच्या प्रेमापोटीच मंदिरे, लोकल आणि जीम सुरु करण्याचा निर्णय घेतलेला नसल्याचं सांगत, येणारे सगळे सण समारंभ साधेपणानं साजरे करण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केलं. त्यांनी आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांशी संवाद साधला.

केंद्र सरकारनं नुकत्याच केलेल्या तीन कृषी कायद्यांबाबत राज्यातल्या शेतकरी संघटनांशी चर्चा सुरू आहे. यातील ज्या बाबी चांगल्या आहेत त्या स्वीकारल्या जातील. मात्र, या कायद्यांबाबत काही आक्षेपही आहेत. त्यामुळे चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

राज्यात विविध भागात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून शासन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

पिकांना हमखास भाव मिळेल या दृष्टीनं शेतकरी आणि बाजारपेठ यांच्यात सांगड घालणारी जे विकेल तेच पिकेल ही योजना शासन राबवीत असून त्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. कांद्यानंतर कापूस, तूर, मुग, आदी पिकांच्या दीर्घकाळ साठवणूकीसाठी कोल्ड स्टोअरेजची व्यवस्था शासन उभारत असल्याचं ते म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा