मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे निकटवर्ती अज्जू हिंदुस्तानी यांच्या संपुर्ण कुंटूबाचे कोरोनाने निधन

नवी दिल्ली, दि. ७ ऑगस्ट २०२०: भारतात वेगाने पसरत असलेला कोरोना संसर्ग थांबविण्याचा सरकारचे प्रयत्न संपूर्णपणे अपयशी ठरले आहेत का? असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे. देशभरात लागू केलेल्या लॉकडाऊननंतरही कोरोनाचा संसर्ग कमी झालेला नाही. संपुर्ण देशामध्ये कोरोना रुग्णाची संख्या १९ लाखाच्या पुढे गेली आहे.

कोरोनाने सामान्य आणि आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्र्यांसह प्रत्येक सामान्य आणि खास व्यक्तीला आपल्या विळख्यात घेतले आहे. तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय माध्यमांनी, वृत्त वाहिन्यांनी कोरोनावरील विजय म्हणून सरकारचे गुणगान गायले आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या संघटनेचे प्रभारी हिंदू युवा वाहिनी आणि स्वत: सीएम योगी यांचे निकटवर्ती असलेले उत्तर प्रदेशच्या बस्ती जिल्ह्यातील रहिवासी असलेले अज्जू हिंदुस्तानी यांचे ३० जुलै रोजी कोरोनामूळे निधन झाले होते. त्यांची बहीण कोरोना रुग्ण होती आणि त्यांच्या मृत्यूची बातमीही समोर येत आहे. कोरोना संसर्गामुळे आपल्या बहिणीच्या निधनानंतर अज्जू हिंदुस्तानीची आईही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळली आणि अखेर त्यांचेही निधन झाले.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे जवळचे मानले जाणारे अज्जू हिंदुस्तानी यापूर्वी वादग्रस्त विधान देऊन चर्चेत आले होते. ज्यात ते म्हणाले होते की तबलीगी जमात आणि रोहिंग्या देशात कोरोना पसरवत आहेत. जे तबलीगी यांना पकडतील त्यांना आमच्या संस्थेकडून ११ हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल. याबरोबरच अज्जू हिंदुस्तानी यांनी म्हटले होते, हवन करुन कोरोना संसर्ग रोखू शकता येते. त्याने हवनाचे नियोजन कितीतरी ब्लॉकवर केले होते आणि ते स्वतःने सुद्धा केले होते. एवढे करूनही अज्जू हिंदुस्तानी बरोबरच त्यांची आई आणि बहीण कोरोनाच्या संसर्गामुळे आपले प्राण गमावून बसले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा