पुणे, ११ ऑक्टोबर २०२२ : यावर्षी भारतातून ऑस्करमध्ये दाखल झालेल्या गुजराती चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत असलेला ‘छेल्लो शोचा’ अभिनेता आणि बालकलाकार राहुल कोळीचं निधन झालं आहे. राहुल हा कॅन्सरग्रस्त होता, छेल्लो शो चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या एकूण सहा कलाकारांपैकी राहुल हा एक होता.
राहुल ला ल्यूकेमिया हा आजार झाला होता. उपचारासाठी त्याला अहमदाबाद येथील कर्करोग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, गेल्या चार महिन्यापासून राहुल वर उपचार सुरू होते.
राहुल गुजरातच्या जामनगरमधील हापा गावात आपल्या कुटुंबासह राहत होता. त्याचे वडील हे रिक्षा चालक आहेत मुलाच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे, राहुलचा छल्लो शो हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या दोन दिवसा आधीच निधन झालं आहे.
फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने काही दिवसापूर्वीच ९५ व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात छेल्लो शोची निवड केली होती, छेल्लो चे दिग्दर्शक. पेन नलिन यांनी केल आहे. राहुल ने या चित्रपटात मनू नावाची महत्वाची भूमिका साकारलेली होती.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव