बुलढाणा २० फेब्रुवारी २०२४ : बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात ‘वन्यजीव सोयरे’ संस्थेच्या चिमुकल्यानीं झाड़ाला पाणी देत अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी केलीय. परिसरातील संतसेवालाल महाराज टेकडी परिसरात, हि निसर्ग संवर्धनाची मोहीम राबवण्यात आली असून चिमुकल्यांनी टेकडी वर पाणी चढ़वून नेत झाड़ाला पाणी देऊन त्यांच्याबद्दल प्रेम आणि काळजी दाखवली.
मुलांनी झाड़ाला ठीबक सिंचन पद्धतीचा उपयोग करून प्लास्टिक बॉटलच्या सहाय्याने पाणी देण्याची प्रक्रिया राबवली. यामुळे पाण्याचा योग्य वापर आणि संवर्धन सुनिश्चित झालं. छत्रपती शिवरायांनी दाखवलेल्या निसर्ग संवर्धनाच्या मार्गानुसार आम्ही या उपक्रमाद्वारे सामाजिक बांधिलकी जपत असल्याचे उपस्थित मुलांनी सांगितले.
न्युज अनकट प्रतिनीधी : शिवाजी मामनकार