चीन करू शकतो भारतावर सायबर हल्ला

नवी दिल्ली, दि. २३ जून २०२०: सीमेवर विवाद सुरू असताना चीन भारताविरूद्ध आणखी एक भयंकर हालचाली करण्याच्या तयारी करत आहे. चीन भारतावर सायबर हल्ला करू शकतो अशी बातमी आहे. हा सायबर हल्ला ncov2019.gov.in या ईमेलवरून केला जाऊ शकतो. या ईमेलचा सब्जेक्ट ‘Free Covid 19 Test’ असू शकतो.

चिनी सायबर हल्ल्यापासून वाचण्यासाठी या ईमेल आयडी वरून आलेल्या कोणत्याही मेल मधील अटॅचमेंट उघडू नका, असे सांगितले जात आहे की २० लाख लोकांचे ई-मेल अकाउंट या सायबर हल्ल्याचे लक्ष्य ठरू शकतात. हा सायबर हल्ला वैयक्तिक तसेच कंपन्यांशी संबंधित असलेल्या ईमेल अकाउंटवर केला जाऊ शकतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे नुकताच ऑस्ट्रेलियावरही सायबर हल्ला झाला होता.

गुप्तचर यंत्रणांनी सायबर हल्ल्याची माहिती दिली असून, त्यानंतर तीन चार वेबसाइटवरही नजर ठेवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार चिनी हॅकर्सनीही या सायबर हल्ल्याची तयारी सुरू केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा