अखेर चीनने बनवला “कृत्रिम सूर्य”…..

बीजिंग, ६ डिसेंबर २०२०: चीन जगभरात काय करेल याचा नेम नाही आणि अश्यातच आता चीनने टेक्नॉलॉजी आणि नवीन शोध लावण्याच्या बाबतीत जगाच्या महाशक्ती आसलेले अमेरिका, जापान आणि रशियाला ही मागे पाडले आहे. चीनच्या वैज्ञानिकांनी न्यूक्लिअर फ्यूजन रिएक्टर संचालनात एक मोठं यश प्राप्त केलं आहे.

चीननं स्वताचा असा “अर्टिफिशियल सन” म्हणजे “कृत्रिम सूर्य” न्यूक्लिअर फ्यूजन रिएक्टर ला यशस्वीपणे पुर्ण करून जगातील दुसर्या सूर्याच्या दाव्याला खरं केलं आहे. चीनी मिडियाने यामधे आर्टिफीशियल सन हा खर्या सूर्यापेक्षा जवळपास दहा पटीने आधिक गरम आसल्याचे सांगितले. चीनी मिडियाने या यशाला देशाच्या महान परमाणु उर्जा अनुसंधान क्षमतेत एक मोठी घटना आहे असा दावा केला. चीनच्या दक्षिण पश्चिमी सिचुआन प्रांतामधे न्यूक्लिअर फ्यूजन रिएक्टर चा पहिल्यांदा संचालन केले.

स्वतामधे तापमान क्षमता मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या रिएक्टर ला “आर्टिफीशियल सन” म्हणजे “कृत्रिम सूर्य” म्हटलं जाते. या बाबतीत चीनी मिडियाने शुक्रवारी माहिती दिली. मिडियाच्या मते हा डिवाइस तयार झाल्यामुळे चीनला न्यूक्लिअर पाॅवर रिसर्च मधे मदत होईल.

चीनने का तयार केला “आर्टिफीशियल सन”…..

चीनच्या वैज्ञानिकांनी या रिएक्टर ला HL-2 असे नाव दिले आहे. वैज्ञानिकांच्या मते हा चीनचा सर्वात मोठा आणि आधुनिक न्यूक्लिअर फ्यूजन एक्सपेरीमेंटल रिसर्च डिवाइस आहे. हा डिवाइस गरम प्लाज्मा ला मिळवण्यासाठी ताकदवर मेग्नेटिक फील्ड चा वापर करतो आणि १५ करोड सेल्सियस तापमानावर पोहचू शकतो. यामुळे चीनला आर्थिकदृष्ट्या मजबूती मिळेल.

पुढे चीनची योजना काय…..

चीनी मिडिया नुसार वर्ष २००६ पासून चीन चे वैज्ञानिक छोट्या न्यूक्लिअर फ्यूजन रिएक्टर च्या विकासासाठी काम करत होते. आता चीन या डिवाइसला अंतरराष्ट्रीय थर्मोनूक्लियर एक्पेरिमेंटल रिएक्टर वर काम करण्यासाठी सर्व वैज्ञानिक एकत्र मिळून योजना करत आहे. चीन हे कार्य २०२५ पर्यंत पुर्ण करू शकते. सध्या संपूर्ण जगाचे लक्ष हे चीनच्या वैज्ञानिकांवर असून सर्वत्र चर्चा आहे. तर चीनी वैज्ञानिकांच्या दृष्टिकोनातून मोठे यश प्राप्त केले आहे. जगातील सर्वात मोठे न्यूक्लियर फ्यूजन रिसर्च सेंटर फ्रान्स मधे आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा