तालिबान राजवटीला आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी चीन आला पुढे , ३१ मिलियन डॉलर्सची दिली मदत

काबुल, १० सप्टेंबर २०२१: अफगाणिस्तानवर तालिबानचे राज्य आल्यापासून चीनचा त्याकडे कल दिसून येतो.  आता चीनने तालिबानला आर्थिक मदत जाहीर केली आहे.  चीनने गेल्या तीन आठवड्यांपासून अफगाणिस्तानमधील तणाव संपल्याची प्रशंसा केली आहे, तसेच ३१ मिलियन डॉलर्सच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. चीनने अफगाणिस्तानला दिलेली ही मदत फक्त एक सुरुवात आहे.  तालिबानने आता अफगाणिस्तानमधील परिस्थिती सामान्य करावी असे चीनचे म्हणणे आहे.
 अमेरिकेच्या काढता पाय घेतल्यापासून चीन अफगाणिस्तानमध्ये तालिबानशी चर्चा करत आहे.  चीनने आधीच आवाहन केले होते की जगाने तालिबानसोबत एकत्र काम केले पाहिजे, या भागात आर्थिक मदत सुरू ठेवणे आवश्यक आहे.
 चीनने पुढे केला प्रथम मदतीचा हात
 अफगाणिस्तानात तालिबान सरकारच्या स्थापनेचे  आम्ही स्वागत करतो, असे चीनने म्हटले आहे, “सरकार स्थापनेपासून गेल्या तीन आठवड्यांपासून तेथे असलेले अराजकाचे वातावरण संपले आहे.  नवीन सरकार अफगाणिस्तानच्या पुनर्बांधणीसाठी काम करेल अशी अपेक्षा आहे.” असे चीन ने म्हंटले.
 जेव्हा जग सध्या तालिबानच्या संदर्भात वेट अँड वॉच धोरण स्वीकारत आहे, तेव्हा चीनने मदतीचा हात पुढे केला आहे.  तालिबाननेही गेल्या आठवड्यात जाहीर केले की चीन आर्थिक महासत्ता आहे, त्यामुळे तो त्याला मोठा भागीदार मानतो.  तालिबानच्या मते, चीन अफगाणिस्तानसाठी कोविड -१९ शी संबंधित मदत आणि आर्थिक मदत वाढवू शकतो.
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी अलीकडेच नमूद केले होते की चीन, रशिया आणि पाकिस्तान तालिबान्यांशी कसे व्यवहार करतात हे पाहण्यासारखे असेल.  जो बायडेन यांच्या वक्तव्यानंतर केवळ २४ तासांनी चीनने अफगाणिस्तानसाठी आर्थिक मदत जाहीर केली आहे.
 दुसरीकडे, जर आपण तालिबानबद्दल बोललो तर ते आधीच म्हणाले आहे की ते प्रत्येक देशाशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे.  तालिबानने आश्वासन दिले आहे की त्यांना आधी देशातील परिस्थिती सामान्य करायची आहे जेणेकरून लोक त्यांच्या कामावर परत येऊ शकतील.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा