चीनची पुन्हा आगळीक, अरुणाचल प्रदेश-अक्साई प्रदेशावर पुन्हा केला दावा

चीन, २९ ऑगस्ट २०२३: चीनने आपल्या देशाच्या नवीन नकाशाची आवृत्ती प्रसिद्ध केली आहे. यामध्ये चीनने भारताचा अरुणाचल प्रदेश, अक्साई चीन, तैवान आणि दक्षिण चीन समुद्र आपल्या हद्दीत असल्याचे दाखवत भारताच्या प्रदेशावर पुन्हा दावा केला आहे. चीनने नकाशा जाहीर करताच वाद निर्माण झाला आहे. यानंतर भारताने अरुणाचल प्रदेश हा नेहमीच भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहील असे प्रत्युत्तर दिले आहे.

चीनी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने प्रसिद्ध केले आहे की, चीनने आपल्या देशाचा नवीन नकाशा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये चीनने चीनसह आणि जगातील विविध देशांच्या राष्ट्रीय सीमा रेखाटल्या आहेत. ग्लोबल टाइम्सने प्रसिद्ध केलेल्या चीनच्या या नकाशात अरुणाचल प्रदेश, अक्साई चीन हा प्रदेश चीनचाच प्रदेश असल्याचे चीनने म्हटले आहे.

चीन अरुणाचल प्रदेशला दक्षिण तिबेटचा भाग असल्याचे, तर तैवानलाही आपला भूभाग मानतो. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी तैवानला एकत्र आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी चीनने व्हिएतनाम, फिलिपिन्स, मलेशिया, आणि दक्षिण चीन समुद्रावरही दावा केला आहे. दरम्यान, भारताने चीनचा हा नव्याने प्रसिद्ध झालेल्या नकाशा नाकारला आहे. यावर अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि भविष्यातही तो भारताचाच भाग राहील, असे भारताने चीनला ठणकावून सांगितले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा