चीन युध्दासाठी सज्ज, शी जिनपिंग यांचा सैनिकांना आदेश…..

नवी दिल्ली, २९ नोव्हेंबर २०२०: चीन आणि भारतामधे अजून ही तणाव कायम असून चीनने परत एकदा युद्धाची भाषा केल्याचे दिसून आले आहे. चीनचे सध्या अनेक देशांबरोबर सीमेवरून वाद सुरू आहेत त्यामधे भारताचाही समावेश आहे. तर विस्तारवादी विचारसरणीचा असणारा चीन पुन्हा आपल्या तोंडातुन युद्धाची भाषा ओकत आहे.

लद्दाख सीमेवर भारत चीन मधे तणाव आसून तणाव कमी करण्यासाठी भारताने अनेक शर्थीचे प्रयत्न केले आहेत. पण, चीनचे सैन्य मागे हाटण्यास तयार नाही. त्यात युद्धाची भाषेमुळे तणाव आणखी निर्माण झाला आहे.

सैनिकांनी मृत्यूला घाबरू नये, त्यांनी युद्धासाठी तयार रहावं असं आव्हान चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी केलंय. पुढे ते सैनिकांनी युद्ध आपल्यालाच जिंकायचे या भावनेने तयारी केली पाहीजे. असे मिल्ट्री कमांडर्स’ना मार्गदर्शन करताना एका कार्यक्रमात ते बोलत होते.

युद्धासाठी लागणारी सर्व साधनसामुग्री आणि शस्त्रांची सज्जता ठेवा आणि युद्धासाठी आवश्यक आसलेल्या तयारीला गती देण्याचे आदेश दिले. तसेच नौदलाने सर्व सामर्थ्यनिशी युद्धाची तयारी करावी, प्रत्येक आघाडीवर सतर्क रहा असे मागच्या महिन्यातच त्यांनी सैनिकांना सांगितले होते. तर पुन्हा एकदा कमांडर्सच्या बैठकीत युद्धाचा सुर छेडत सैनिकांना सज्ज राहण्याचा सुचना दिल्या.

सध्या चीनचे अमेरिका, तैवान आणि भारता बरोबर तणाव आहे. तर नेपाळ आणि तिबेट मधे चीनने काही भुभाग बळकावला असून आता युद्धाची भाषेवर तज्ञांनी देखील आपले मत नोंदवत शी जिनपिंगच्या बोलण्यातून युद्धाचे संकेत मिळत आसल्याचे सांगितले. चीनच्या प्रसारमाध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा