गोगरा आणि हॉट स्प्रिंग्जमधून मागे हटण्यास चीन चा नकार

नवी दिल्ली, ११ एप्रिल २०२१: भारत आणि चीन यांच्या सीमेवरील तणाव कमी करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, दोन्ही देशांमधील लष्करी-स्तरावरील संवाद चालू आहे. दरम्यान, चीनच्या सैन्याने पूर्व लडाखमधील गोगरा आणि हॉट स्प्रिंग्जमधून आपले सैन्य आणि वाहने काढण्यास नकार दिला आहे.

चीनची ही कठोर वृत्ती फेब्रुवारी महिन्यात पॅगोंग लेक क्षेत्रावरील दोन्ही स्तरावर सैन्य मागे घेण्याच्या संमतीनंतर आली. भारतीय लष्कराच्या १४ कोर्प्स असलेल्या एका शीर्ष स्रोताने सांगितले की, काल दोन्ही देशांमधील ११ व्या फेरीतील चर्चा झाली असून त्यामध्ये चीनकडून कठोरपणा दर्शविला गेला.

दोन्ही देशांमधील लष्करी-स्तरावरील ११ व्या फेरीची बैठक जवळपास १३ तास चालली आणि लडाखमधील गतिरोध कमी करण्यासाठी विवादित पॅगोंग सरोवरातून सैन्य मागे घेण्याबाबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर ही बैठक झाली. त्यावेळेस दोन्ही देशांचे सैन्य तब्बल १० मीटरच्या अंतरावर समोरासमोर गस्त घालण्यासाठी थांबले होते. ही चर्चा २० फेब्रुवारी रोजी झाली होती.

चीनच्या सैन्यदलाने विशालकाय तलावाच्या उत्तरेकडील फिंगर्स कॉम्प्लेक्समध्ये माघार घेण्याची कारवाई केली असल्याचे सॅटेलाइट प्रतिमेत स्पष्ट झाले. तथापि, चीन अद्याप गोग्रा आणि हॉट स्प्रिंग्ज प्रदेशांबद्दल ठाम आहे. हे दोन्हीसाठी महत्वाचे आहे. या दोन्ही चौक्यांमधील सीमेचे सैन्य आणि वाहने एकसमान टप्प्याने कमी करण्याचा प्रस्ताव भारताने दिला होता, परंतु चीनच्या बाजूने त्यास नकार देण्यात आला.

भारतीय लष्कराने काल झालेल्या चर्चेनंतर जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले होते की, हा वाद संपवण्यासाठी चर्चेची फेरी सुरू ठेवेल. चीन साठी गोगरा, हॉट स्प्रिंग्ज आणि कोंगका ला हा प्रदेश खूप महत्वाचा आहे. चिनी सैनिकांसाठी या भागात मोठ्या प्रमाणावर साधनसामग्री आहे. मोटारयुक्त पायदळ विभागाचे घटक, एक तोफखाना ब्रिगेड आणि हवाई संरक्षण युनिट देखील या भागात तैनात आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा