नवी दिल्ली, 30 जानेवारी 2022: भारताशी स्पर्धा करण्यासाठी पाकिस्तानने चीनकडून SH-15 Howitzer खरेदी केले आहे. जे भारताच्या सीमेला लागून असलेल्या डोंगराळ भागात तैनात केले जाईल. चीनमध्ये बनवलेले हे शस्त्र 155 मिमी शेल फायर करू शकते. ते ट्रकवर देखील बसवता येते. या वैशिष्ट्यांमुळं ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणं सोपं होणार आहे.
पाकिस्तानने 2019 मध्ये चीनकडून 236 SH-15 हॉवित्झर खरेदीसाठी करार केला होता. यातील काही युनिट्स या वर्षी पाकिस्तानकडं सोपवण्यात येणार आहेत. 2018 मध्ये, हाच हॉवित्झर कराचीतील डिफेन्स एक्सपोमध्येही पाठवण्यात आला होता. पाकिस्तानने याची चाचणी कराचीजवळील डोंगराळ भागात केल्याचं सांगण्यात आलं.
हे शस्त्र पहिल्यांदा 2017 मध्ये उघड झालं होतं. ज्याची रचना चीनच्या जुन्या SH-1 Canon वर आधारित आहे. ते प्रामुख्यानं निर्यातीसाठी तयार करण्यात आलं आहे. आता चीननेही त्यात अनेक बदल केले आहेत. हे शस्त्र 2018 मध्ये PCL-181 (PCL-181 China) नावानं चिनी सैन्यात समाविष्ट करण्यात आलं होतं.
हे चीनच्या जुन्या PL-66 फील्ड हॉवित्झरच्या जागी तैनात करण्यात आलं होतं. पण 2019 मध्ये लष्करी परेड दरम्यान चीनने अधिकृतपणे आपले हॉवित्झर प्रदर्शित केले. या PCL-181 हॉवित्झरची रेंज 53 किमी पर्यंत आहे. यात पाच क्रू मेंबर्स जाऊ शकतात. त्याची केबिन बुलेटप्रुफ आहे.
त्याच्या खिडक्या आणि विंडशील्ड देखील बुलेटप्रूफ आहेत. त्याच्या एका ट्रकमध्ये 60 राउंड दारूगोळा वाहून नेण्यासाठी चार बॉक्स असतात. चीनच्या सरकारी मालकीच्या नॉर्दर्न इंडस्ट्रीज कॉर्पोरेशनने हॉवित्झर विकसित केलंय. हे शस्त्र डोंगराळ, मैदानी आणि दलदलीच्या भागात वापरता येईल, असा कंपनीचा दावा आहे. अनेक रिपोर्ट्समध्ये असंही म्हटलं गेलं आहे की ते न्यूक्लिअर वॉरहेड्स दागण्यास सक्षम आहे. पण त्याची कुठेही पुष्टी झालेली नाही.
पाकिस्तान 1984 पासून अण्वस्त्रांच्या छोट्या आवृत्त्या बनवण्याचं काम करत आहे. पाकिस्तानचे माजी लष्करी हुकूमशहा आणि स्वयंघोषित राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी एका अमेरिकन मुत्सद्द्याला सांगितलं आहे की, पाकिस्तानकडंही छोटे अणुबॉम्ब आहेत. अशी शक्यता वर्तवली जात आहे की, पाकिस्तान छोटा शेल मध्ये न्यूक्लिअर सामग्री वापरून चीनकडून घेतलेला या SH-15 Howitzer सहाय्याने दागू शकतो.