अंतराळात चीनची मोठी झेप, ३ चिनी एस्ट्रोनॉट्स स्पेस स्टेशनकडं रवाना

पेइचिंग, १८ जून २०२१: चीननं ५ वर्षानंतर पुन्हा एकदा आपल्या एस्ट्रोनॉट ला अंतराळात रवाना केलंय. चीनचं महाशक्तिशाली लाँग मार्च -२ एफ वाय १२ रॉकेट अंतराळयान गुरुवारी सकाळी तीन अंतराळवीरांना घेऊन शेनझोऊ -१२ कडं रवाना झालंय. हे एस्ट्रोनॉट येत्या काही तासांत चीनच्या स्वत: च्या स्पेस स्टेशन Tianhe वर पोहोचतील. असं सांगितलं जात आहे की चीन आता या स्पेस स्टेशनच्या मदतीनं संपूर्ण जगावर लक्ष ठेवू शकंल.


अंतरिक्ष मध्ये आधीपासूनच जुनं झालेलं आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन आहे. चिनी स्पेस स्टेशनची स्पर्धा पश्चिम देशांच्या स्पेस स्टेशनशी होईल. चीनी मीडियाच्या म्हणण्यानुसार, लाँग मार्च रॉकेटनं नैऋत्य चीनच्या गानसू प्रांतातील गोबी वाळवंटातून उड्डाण केलं. त्यांनी सांगितलं की हे चिनी एस्ट्रोनॉट्स पुढील तीन महिने अवकाशात राहतील. हे एस्ट्रोनॉट्स चिनी स्पेस स्टेशनचं निर्माण कार्य पूर्ण करतील आणि वैज्ञानिक क्रिया करतील.


चिनी स्पेस स्टेशन पुढील वर्षापर्यंत तयार होण्याची शक्यता


‘चायना मॅन्ड स्पेस एजन्सी’ (सीएमएसए) चे संचालक, सहाय्यक शी किमिंग यांनी सांगितलं की, ‘शेनझोऊ -१२’ हे अंतराळयान जिउक्वान उपग्रह प्रक्षेपण केंद्रावरून प्रक्षेपित केलं गेलं. यात चीनच्या स्पेस स्टेशनच्या निर्मितीसाठी निए हेशेंग, लियू बोमिंग आणि तांग हांग्बो हे तीन अंतराळवीर रवाना झाले आहेत. स्पेस स्टेशन च्या निर्मिती दरम्यान एस्ट्रोनॉट्स ला वाहून नेणारी ही पहिली चिनी मिशन आहे.


पुढील महिन्यात देशातील सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी (सीपीसी) च्या १०० व्या वर्धापन दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर या अभियानाची सुरूवात केली जात आहे. शेनझोऊ -१२ वर जाणारे एस्ट्रोनॉट्स कोर मॉड्यूलमध्ये राहतील आणि तीन महिन्यांसाठी पृथ्वीच्या कक्षामध्ये राहतील. चिनी स्पेस स्टेशन पुढील वर्षापर्यंत तयार होण्याची शक्यता आहे. स्पेस स्टेशन अंतराळातून संपूर्ण जगावर लक्ष ठेवणार आहे आणि जुन्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनशी (आयएसएस) स्पर्धा करेल. आयएसएस हे नासा (यूएसए), रोजकोसमॉस (रशिया), जॅक्सए (जपान), ईएसए (युरोप) आणि सीएसए (कॅनडा) चा प्रकल्प आहे.


न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा