चीनची दादागिरी कायम, सैन्य माघारी न घेता ४० हाजार अतिरिक्त सैन्य दाखल

नवी दिल्ली, दि. २३ जुलै २०२०: भारत चीन तणाव हा अजून ही तसाच कायम आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येण्या आधी “घर में घुसकर मारेंगें”, “असली कमिया सीमा पर नहीं दिल्ली में है” अशी कणखर विधाने केली होती आणि सत्तेत आल्यावर मात्र पाकिस्तानला दम भरता बाकी देशाकडे दुर्लक्ष केले की काय हा प्रश्न सध्या उपस्थित होताना दिसतोय. मोदी यांनी चीनच्या ५९ अॅपवर बंदी आणली खरी पण भारत चीनमधे ८५ अब्ज डाॅलरचा आर्थिक व्यवहार चालतोय.

चीन सीमेच्या वादावरुन भारतावर आज पर्यंत नेहमी दादागिरी करत आला आहे. त्यात काही दिवसापुर्वी म्हणजे जवळपास ४५ वर्षानंतर चीन भारतांच्या सैनिकांमधे हिंसक चकमक झाली होती ज्यामधे भारताचे २० जवान हे शहीद झाले होते. त्यानंतर तणाव मोठ्या प्रमाणात वाढला होता.

सीमेवरून सैन्य कमी करावी म्हणून भारत आणि चीनमध्ये लष्करी आणि राजनैतिक अशा दोन्ही पातळीवर चर्चा सुरू आहेत. तर त्यावेळी चीनने त्याला मान्यता देखील दिली होती. पण, त्यानंतर चीनी सैन्य माघारी घेत असल्याची बातमी अनेक प्रसार माध्यमांमधे झळकत होती. मात्र, चीनने प्रत्यक्षात सैन्य माघारी तर घेतले नाहीच याउलट ४० हजार सैन्य सीमेवर तैनात केले आहे. त्यांनी संरक्षण यंत्रणा, सशस्त्र सैनिकांच्या वाहतुकीची साधने आणि लांब पल्ल्याच्या तोफा तैनात करण्यास सुरुवात केली आहे. तर चीनचे सैन्य पूर्व लडाखसह संपूर्ण सीमेवर पसरले आहेत.

लष्कराच्या सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे पिंगर पाच क्षेत्रात देखरेख चौकी स्थापन करायची असल्याने तिथून सैन्य माघारी घेण्यास चीनने नकार दिला होता. तर चीनने हॉट स्प्रिंग आणि गोग्रा भाग ताब्यात घेतला आहे. तिथून माघार घेतल्यास भारतीय फौजा तो भू प्रदेश हस्तगत करतील, असे सांगत तेथून काढता पाय घेण्यास अनिच्छा व्यक्‍त करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

चीनच्या या मुजोरीपणाचा हा पहिला किस्सा नसून असे अनेक वेळा चीनने भारताला सीमेवर दगा दिला. या कोरोना महामारीत संपूर्ण जगाचे लक्ष हे त्या विषाणू वरुन हटवून युद्ध जन्य परिस्थिती कडे वळविण्याचा मानस चीनचा असल्याचे अनेक जाणकार हे सांगत आहेत. तर या पुर्वी १४ आणि १५ रोजी झालेल्या बैठकीत दोन्ही बाजूने सैन्य माघारी घेण्यावर देखरेख ठेवण्याचे मान्य केले होते. तर चीनने नेहमीप्रमाणे हा शब्द फिरवल्याचे वास्तव समोर आले आहे. देशाचे राष्ट्रीय सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे मंत्री यांच्यात झालेल्या बैठकीत सैन्य मागे घेण्यास चीनने मान्यता दिली होती.

भारताची भूमिका ही दोन्ही बाजूने सैन्य माघारी घेणे हाच तणाव निवळण्याचा एकमेव मार्ग असल्याचे स्पष्ट मत होते.पण या तत्वावर चीनचा चालण्याचा विचार नसून तो अजूनही या मधे भारतावर दादागिरी दाखवत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा